सातारा: पिलीव घाटामध्ये सातारा-पंढरपूर एसटी बसवर अज्ञातांकडून हल्लात 2 जण जखमी; हल्लेखोरांचा शोध सुरू
तर सातारा आणि सोलापूर अशा दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
सातार्याच्या (Satara) पिलीव घाटामध्ये (Piliv Ghat) मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एका एसटी बस वर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सातारा-पंढरपुर (Satara-Pandharpur St Bus) या मार्गावर जाणार्या प्र्वासी बसला यामध्ये लक्ष करण्यात आले होते. एसटी बस चालकाला या हल्ल्यात जखम झाली पण त्याने धीटाने गाडी सुरूच ठेवत प्रवाशांवरील पुढील मोठा अनर्थ टाळला. दरम्यान नंतर घाटातून येणार्या-जाणार्या इतर गाड्यांनाही त्याने या प्रकाराची माहिती देऊन दक्ष केले आहे.
रात्री पंढरपूर कडून निघालेली बस 10 च्या सुमारास पिलीव घाटामध्ये आली. त्यानंतर अचानक 10-12 व्यक्तींकडून दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीमध्ये बसची पुढची काच फुटली. मात्र चालकाने गाडी तशाही परिस्थितीमध्ये पुढे नेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ही माहिती कळताच काही काळ घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. नंतर पोलिस सुरक्षेमध्ये दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यान एसटी प्रमाणेच एका दुचाकीस्वाराला देखील या हल्लात जखम झाली आहे.
दरम्यान सकाळ वृत्तपत्राशी बोलताना पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी हा दरोडा नसून अज्ञातांकडून करण्यात आलेला हल्ला असल्याचं म्हटलं आहे. लवकरच या भागात म्हसवड आणि माळशिरस पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू केले जाईल अशी देखील माहिती देण्यात आली आहे. तर सातारा आणि सोलापूर अशा दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांकडोऔन हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.