सातारा: मांजरांवरुन दोन सख्खा भावांमध्ये पेटला वाद; मारहाणीनंतर गाठले पोलिस स्टेशन
मांजरांनी दिलेल्या त्रासामुळे दोन सख्खा भावांमधील भांडण मारहाणीपर्यंत पोहचले.
दोन मांजरांवरुन (Two Cats) सख्खा भावांमध्ये जोरदार भांडण झाल्याची घटना सातारा (Satara) येथे घडली आहे. मांजरांनी दिलेल्या त्रासामुळे दोन सख्खा भावांमधील भांडण मारहाणीपर्यंत पोहचले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव (Koregaon) तालुक्यातील तळीये (Taliye) गावात ही घटना घडली असून याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Uttar Pradesh: धक्कादायक! उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यात पाळीव कुत्र्यावरून शेजाऱ्याशी झालेल्या भांडणात वृद्ध व्यक्तीवर गोळीबार)
शेख बंधू कोरेगाव येथे शेजारी राहतात. त्यापैकी अहमद शेख (43) यांच्या घरावरील पत्रा खराब असल्याने त्यांनी त्यावर प्लास्टिकचा कागद अंतरला आहे. हा कागद शेजारी राहणाऱ्या भावाच्या पाळीव मांजरांनी कुरडतला. हे लक्षात येतात त्यांनी भावाच्या मुलीला मांजरांचा बंदोबस्त करण्यास सांगितले. यावरुन दोन भावंडांमध्ये मोठा वाद झाला.
हे भांडण बाचाबाची पर्यंत मर्यादीत न राहता मारहाणीपर्यंत पोहचले. मधल्या भावाने धाकट्या भावाला दांडक्याने रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. त्यांची पत्नी आणि मुलगा हा वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. अखेर या भांडणाने पोलिस स्टेशन गाठले. अहमद शेख यांनी दाखलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी शरप्पूउ शेख, साहील शेख, हिना शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (मांजर होणार Karl Lagerfeld च्या तब्बल 14 हजार कोटींच्या मालमत्तेची वारस; ठरणार जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी)
दरम्यान, आतापर्यंत सत्ता, संपत्ती, पैसा यावरुन दोन भांवडांमध्ये भांडणं, वाद झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र छोटीशी मांजरं दोन भावंडांमधील वादाचे कारण ठरु शकतात, हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.