Satara Accident: सातारा मध्ये वडूज दहिवडी रस्त्यावर तिहेरी अपघात; 2 जिवलग मित्रांवर काळाचा घाला
महाराष्ट्रामध्ये वाढती अपघात संख्या ही चिंतेची बाब आहे. जानेवारी 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दररोज 42 अपघाती मृत्यू होत आहेत.
सातारा (Satara) मध्ये रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सातार्यातील हा अपघात तिहेरी होता. भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारने ओमिनीला धडक दिली. आणि ती पुढे असलेल्या पिकअप गाडीला धडकली. या अपघातामध्ये दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार अशी दोन्ही मृत तरूणांची नावं आहेत.
अपघातानंतर जखमींना सातारा मधील खाजगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या या अपघाताची नोंद वडूज पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. हा अपघात सोमवार 7 एप्रिल दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास झाला आहे. दरम्यान या अपघातातील दोन्ही तरूण औंध मधील होते. त्यांच्या अपघाती निधनाने औंध गावावर शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्रामध्ये वाढती अपघात संख्या ही चिंतेची बाब आहे. जानेवारी 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दररोज 42 अपघाती मृत्यू होत आहेत. नक्की वाचा: Metro Flyover Beam Falls on Car in Mira Road: मुंबईतील मीरा रोड येथील मेट्रो फ्लायओव्हरवरून कारवर पडला बीम; थोडक्यात वाचला चालकाचा जीव (Watch Video).
अहवालानुसार, 2024 मध्ये, राज्यात 36,084 रस्ते अपघात झाले, जे 2023 मध्ये नोंदलेल्या 35,243 अपघातांपेक्षा 841 ने वाढले. मात्र, मृतांमध्ये 0.20% ने किंचित घट झाली. 2023 मध्ये 15,366 मृत्यू झाले होते, जे 2024 मध्ये 15,335 पर्यंत, म्हणजेच 31 मृत्यूंची घट झाली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)