अमरावती मध्ये सरपंचासोबत उपसरपंच अडकले विवाहबंधनात; खास आहे लव्हस्टोरी

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समिती अंतर्गत कांडली ग्रामपंचायतीचे सरपंच सविता आहाके आणि उपसरपंच दिलीप धंडारे काल लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

Image For Representation (Photo Credits: Pixabay)

प्रत्येक लव्हस्टोरी ही खास असते. पण अमरावती मध्ये चक्क एक सरपंच आणि उपसरपंच लग्नाच्या बेडीत अडकल्याने सध्या या लव्हस्टोरीची खास चर्चा रंगत आहे. काल (19 फेब्रुवारी) शिवजयंतीच्या मुहूर्तावर ही जोडी विवाहबद्ध झाली आहे. वर्षभरापूर्वी गावाचा कारभार सांभाळत असताना त्यांच्या संसाराची स्वप्न देखील त्यांनी फुलवली आणि आता वैयक्तिक आयुष्यात त्यांची 'युती' झाल्याने पुढील पाच वर्ष किमान ग्रामपंचायतीवरील सत्ता मजबूत झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समिती अंतर्गत कांडली ग्रामपंचायतीचे सरपंच सविता आहाके आणि उपसरपंच दिलीप धंडारे काल लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. कांडली ग्रामपंचायत निवडणुकीत सविता आहाके आणि दिलीप धंडारे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. 2020-21 मध्ये सविता आहाके सरपंच तर दिलीप धंडारे उपसरपंच झाले आहेत. नक्की वाचा: Ruturaj Deshmukh, 21 वर्षीय सरपंच ने सोलापूरच्या घाटणे गावाला 'बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' मॉडेलने केले कोरोनामुक्त .

ग्रामपंचायतीमधून काम करताना दारूची दुकाने, गॅस गोडाऊन बंद करणे, वीज वितरण कंपनीवर कर लावणं यासाठी सरपंच, उपसरपंचाची जोडी काम करत होती. तालुक्यामध्ये त्यांची चर्चा झाली. शिवजयंतीवर विवाहबद्ध होत असल्याने त्यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवरदेखील शिवाजी महाराज झळकत होते.