Sanjay Raut on Central Government: संपूर्ण देशच केंद्र सरकारने उद्योगपतींना विकला; संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर

केंद्र सरकारने (Central Government) आता अवघा देशच उद्योगपतींना विकला आहे.

Sanjay Raut, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या संपत्तीवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्र सरकारने (Central Government) आता अवघा देशच उद्योगपतींना विकला आहे. हा देश त्यांनी आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकला आहे. इतके करुणही तुमचे पोट भरले नसेल तर आता आणखी कायी विकायचे राहिले आहे का? असा सवाल करत आपण देशाची संपत्ती विकली असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत जाधव यांच्या संपत्तीवरुन प्रश्न उपस्थित करत म्हटले होते की, यशवंत जाधव यांची संपत्ती विका आणि शेतकऱ्यांना पैसे द्या, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला होता. यावर संजय राऊत यांना प्रसारमाध्यांनी विचारले असता इथे शेतकऱ्यांना द्यायला पैसै नाहीत आणि आपण असले सल्ले देता. तुम्हीच तर म्हणाला होता गरीबांच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकणार म्हणून. पण आता एक पैसाही टाकला नाही.

पाठिमागील सात वर्षांमध्ये केंद्र सरकारने अवघा देशच विकला आहे. एक एअर इंडिया राहिली होती. तीसुद्धा विकली. आता देशात विक्रीसाठी काही राहिले नाही. त्यामुळे काय विकायचा हा त्यांना प्रश्न पडला असेल. आम्ही 2024 च्या दृष्टीने तयारी करतो आहोत. विदर्भात शिवसेनेची मोठी ताकद होती. आजही आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत आम्ही लवकरच नागपूर दौऱ्यावर जाणार आहोत. नागपूरमध्ये शिवसेना वाढवत आहोत, असेही राऊत म्हणाले. (हेही वाचा, Loudspeaker Row: देशात भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण तयार करावे, त्याची अंमलबजावणी बिहार व गुजरातपासून सुरु करावी; नेते संजय राऊत यांचे मोदी सरकारला आवाहन)

दरम्यान, आयएनएस विक्रांत हे साधे प्रकरण नाही. ते हलक्यात घेऊ नका. आज जामीनावर बाहेर होऊन कोणी कितीही गमजा मारत असले तरी हे प्रकरण मोठ्या घोटाळ्याचे आहे. आम्ही पुराव्यानिशी बोलत आहोत. लोकांकडून पैसे गोळा केले आणि ते उचित ठिकाणी पोहोचलेच नाहीत. आयएनएसचा घोटाळा हा 58 कोटी रुपयांचाच आहे. हा आकडा कोठून आला याचे उत्तर पोलीस देतील, असेही संजय राऊत यांनी या वेळी सांगितले.