Sanjay Raut vs BJP: पंतप्रधान मोदी आणि आदित्य ठाकरे यांचा ब्रांड एकच; संजय राऊतांनी दिलं BJP ला उत्तर

संजय राऊतांनी या एका फोटोवरून सुरू झालेल्या चर्चांवरून भाजपाने हा प्रकार म्हणजे 'आ बैल मुझे मार' प्रकार केल्याचं म्हटलं आहे

Sanjay Raut | Twitter/ANI

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल (20 नोव्हेंबर) मकाऊ मधील चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो पोस्ट केला आणि पुन्हा ठाकरे गट -भाजपा मध्ये शाब्दिक युद्ध आणि ट्वीट वॉर सुरू झालं आहे. बावनकुळेंच्या फोटोनंतर भाजपा कडून आदित्य ठाकरेंचा डेव्हिड बॅकहमच्या पार्टीतला फोटो पोस्ट करण्यात आला. त्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा ब्रांड एकच आहे असं म्हटलं आहे.

संजय राऊतांची आदित्य ठाकरेंच्या फोटो वर प्रतिक्रिया

आदित्य ठाकरेंचा फोटो नीट बघा. तो ग्लास आहे की डाएट कोक कॅन हे नीट बघा म्हणजे समजेल मोदींचे किती फोटो दाखवू? मोदी जे पितात तोच आदित्य ठाकरेंचा ब्रांड आहे. असे राऊत म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे डाएट कोक पित आहेत, हे दिसत असताना हे लोक इतके घाबरले की त्यांना फोटो पोस्ट करताना भान राहिलेलं नाही. ईडी आणि सीबीआय यांच्या हातात नसतील तर यांच्यासारखे डरपोक लोक नाहीत. असं म्हणत त्यांनी भाजपावर टीकास्त्र डागताना भाजपा म्हणजे भारतीय जुगारी पार्टी आहे असं म्हटलं आहे. Casino vs Whiskey: कॅसिनो विरुद्ध व्हिस्की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फोटोवरून संजय राऊत आणि भाजपात जुंपली; आदित्य ठाकरेही चर्चेत .

दरम्यान बावनकुळे यांनी देखील आपली बाजू स्पष्ट करताना 'मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.' असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे.

संजय राऊतांनी या एका फोटोवरून सुरू झालेल्या चर्चांवरून भाजपाने हा प्रकार म्हणजे 'आ बैल मुझे मार' प्रकार केल्याचं म्हटलं आहे. ज्या फोटोमध्ये कुणाचंही स्वतः नसताना भाजपाने चर्चा सुरू केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.



संबंधित बातम्या