IPL Auction 2025 Live

Sangli, Miraj and Kupwad Municipal Corporation: सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे पांडुरंग कोरे यांची निवड

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या (Sangli, Miraj and Kupwad Municipal Corporation) स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे (BJP) पांडुरंग कोरे (Pandurang Kore) विजयी झाले आहेत.

पांडुरंग कोरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या (Sangli, Miraj and Kupwad Municipal Corporation) स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे (BJP) पांडुरंग कोरे (Pandurang Kore) विजयी झाले आहेत. भाजपा उमेदवार पांडुरंग कोरे यांना 9 तर काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांना 7 मते मिळाली. ऑनलाईन पध्दतीच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार पांडुरंग कोरे यांचा बहुमताने विजय झाला. यासह मनपाच्या समाजकल्याण सभापतीपदी स्नेहल सावंत यांची बिनविरोध निवड झाली. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवार सविता मोहिते यांनी माघार घेतली. सोबत सांगली मनपाच्या महिला बालकल्याण समिती सभापती पदी गीतांजली ढोले पाटील यांचा विजय झाला आहे.

ढोले पाटील यांना 9 मते तर मदिना बारूदवाले यांना 7 मते मिळाली. यंदा भाजपने आपले निष्ठावंत नगरसेवक पांडुरंग कोरे यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षामध्ये नाराजी पसरली होती. स्थायी समितीमध्ये भाजपचे 9 सदस्य आहेत आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 7 सदस्य आहेत. आज सकाळी ऑनलाईन निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मनपाच्या स्थायी, महिला बालकल्याण, समाजकल्याण, तसेच चार प्रभाग समिती अशा सात सभापती निवडीसाठी 14 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन निवड सभा पार पडली.

(हेही वाचा: राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर)

समाजकल्याण समिती सभापती पदाची निवडणूक बिनविरोध तर अन्य दोन सभापतींच्या निवडी हात उंचावून घेतलेल्या मतदानाद्वारे करण्यात आल्या. भाजपने पहिल्या वर्षी सांगली व दुसऱ्यावर्षी मिरजेला सभापतीपदाची संधी दिली होती. मात्र मनपा सुरु झाल्यापासून 18 वर्षांत कुपवाडला संधी मिळाली नाही. मात्र टा कोरे यांच्या विजयाने भाजपने स्थायी सभापती पदाची खुर्ची अबाधित राखली आहे.