Sant Sneh Milan program at Paithan:वारकऱ्यांसाठी आता स्वतंत्र बँक उभारणार, मंत्री Sandipanrao Bhumre यांचे आश्वासन
त्यावर बोलताना भुमरेंनी प्रत्येक मठाला भेट देऊन त्याच्या विकासासाठी निधी देणार असल्याचं, पैठण घाटावर आरती, एकनाथी भागवत मंदिराची उभारणी व वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँकेची उभारणी करु, असे आश्वासन दिले आहे.
मंत्री संदिपान भुमरे (Sandipanrao Bhumre) यांनी यंदा दिवाळीचं औचित्य साधत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये संत स्नेह मिलन कार्यक्रमाचं (Sant Sneh Milan program at Paithan) आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्यात लवकरच वारकऱ्यांची बँक उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे तर या सोबततच पैठण इथल्या संतपीठाला पूर्ण विद्यापीठाचा दर्जासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. यंदा प्रथमच भुमरेंनी पैठणमध्ये दिवाळीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता. या मेळाव्याला ‘संतस्नेह भेट’ असे नाव देण्यात आले होते.
संत-महंतांकडून मठांचा विकास करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर बोलताना भुमरेंनी प्रत्येक मठाला भेट देऊन त्याच्या विकासासाठी निधी देणार असल्याचं, पैठण घाटावर आरती, एकनाथी भागवत मंदिराची उभारणी व वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँकेची उभारणी करु, असे आश्वासन दिले आहे. या वेळी संत ज्ञानेश्वर संस्थानचे ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, विठ्ठल शास्त्री चनघटे महाराज, शिवानंद महाराज शास्त्री, नामदेव पोकळे महाराज, भवर महाराज आदी उपस्थित होते.नक्की वाचा: Katiki Ekadashi 2022: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात आजपासून विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिर 24 तास खुलं .
पहा ट्वीट
संदिपान भुमरे यांना महाराष्ट्रात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकार मध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री पद आणि रोहयो मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे. संदिपान भुमरे हे शिंदे गटातील नेते आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पैठण मध्ये जाहीर सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केल्यानंतर पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा देखील आता विश्वास द्विगुणित झाला आहे.