सचिन तेंडुलकर याला शेतकरी आंदोलनावरुन दिलेल्या सल्लानंतर सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर टीका

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांनी सचिनला दिलेल्या सल्ल्यावरुन त्यांच्यावर टीका केली आहे.

Sadabhau Khot (Photo Credit: Facebook)

दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या (Farm Laws) विरोधात शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलन केले जात आहे. अशातच हॉलिवूड मधील पॉप सिंगर रिहाना (Rihana) हिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हॅशटॅग वापरुन एक ट्विट केले होते. त्यावर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्याला सल्ला देत असे म्हटले होते की, ज्यांना ज्या क्षेत्रातल कळतं त्यांनी तेच बोलावं. यावरुन आता बहुतांश जणांनी सोशल मीडियात संताप व्यक्त केलाच. पण आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांनी सचिनला दिलेल्या सल्ल्यावरुन त्यांच्यावर टीका केली आहे.(शेतकरी आंदोलनावर Lata Mangeshkar, Sachin Tendulkar सह सेलिब्रिटींच्या ट्वीट्समधील साधर्म्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चौकशीचे आदेश; राज्याचं गुप्तहेर खात करणार तपास)

सदाभाऊ खोत यांनी असे म्हटले आहे की, शरद पवार यांनी क्रिकेट खेळला होता का? तरी सुद्धा ते अध्यक्ष होते असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच पवार हे कुस्तीगीर परिषदेचे सुद्धा अध्यक्ष आहेत. त्यामुळे अनेकांना असे वाटते मला सोडून दुसऱ्याला काहीच कळत नाही असे खोत यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तर सचिन तेंडुलकर याच्यासह लता मंगेशकर, बॉलिवूड मधील कलाकारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया दिल्या होत्या.(सचिन तेंडुलकर ला कृषी कायद्यासंदर्भातील ट्विट बद्दल सल्ला दिल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नागरिकांनी व्यक्त केला संताप)

दरम्यान, रिहाना हिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल ट्विट करत असे म्हटले होते की, त्याबद्दल आपण कोणीच का काही बोलत नाही आहोत? त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे. यासाठी गुप्तहेर खात्याला तपासाचे आदेश दिले गेले आहेत. त्याचसोबत भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असे म्हटले होते की,  पॉप सिंगर रिहाना हिला ट्विटसाठी 18 कोटी रुपये दिले होते. त्यामुळे ऐवढे पैसे तिला कोणी दिले त्याचा तपास केला जावा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif