नागपूर येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 3 मजूरांचा मृत्यू

नागपूर (Nagpur) येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 3 मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नागपूर येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 3 मजूरांचा मृत्यू
Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

नागपूर (Nagpur) येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 3 मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर मुसळधार पावसामुळे जमीन खचल्याने ढिगाऱ्यावर बसलेले तीन मजूर त्याच्याखाली दबले गेले.

कान्हान भागातील खाणी भागात ही घटना घडली आहे. तर आज जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती उपसून कोळसा काढण्याचे काम अनधिकृतरित्या केले जात होते. त्याचवेळी ढिगाऱ्यावर तीन मजूर बसले होते.(मुंबई: गोरेगाव येथे गटारात पडलेल्या 3 वर्षीय दिव्यांश सिंह याचा शोध 30 तासांनंतरही सुरुच)

तर पावसामुळे तेथील जमीन खचली गेल्याचे त्यांना पटकन कळून आले नाही. त्यामुळे ढिगाऱ्यावर बसलेल्या मजूर खाली कोसळून त्यामध्ये दबले गेले. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2019 02:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).