मुंबई-नाशिक मार्गावरील कसारा घाटातील रस्ता खचला; एकेरी वाहतुक सुरु

राज्यातील विविध ठिकाणी मागील दोन तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक मुंबई मार्गावरील जुन्या कसारा घाटातील रस्ता खचला असल्यासाची माहिती समोर येत आहे.

Kasara Ghat (Photo Credits: Facebook)

राज्यातील विविध ठिकाणी मागील दोन तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक मुंबई मार्गावरील जुन्या कसारा घाटातील रस्ता खचला असल्यासाची माहिती समोर येत आहे. यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

जुन्या कसारा घाटातील रस्त्यावर अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. परिणामी सुरक्षेची खबरदारी म्हणून पोलिस खचलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहनधारकांना मार्गदर्शन करत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि शहापूरचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरु याचा परिणाम मुंबई-नाशिक वाहतुकीवर झाला आहे. (मुंबई, ठाणे, कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा)

फेसबुक पोस्ट:

काल झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. दरड कोसळ्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. मुंबईसह कोकणाला जोरदार पावसाचा फटका बसला आहे. आजही मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे.

कालच्या दमदार पावसाने मुंबईकरांची अक्षरशः दैना केली. महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी-बदलापूर दरम्यान रात्रीपासून अडकली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. मात्र NDRF, पोलिस, रेल्वे प्रशासन आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने ट्रेनमधील प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. त्याचबरोबर कल्याणमधील कंबा जवळ पेट्रोल पंप, रिसोर्टमध्ये अनेकजण अडकून पडले होते. त्यांची देखील सुटका करण्यात NDRF ला यश आले. आज मात्र अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे.