पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचा ऐतिहासिक निर्णय; मार्केट यार्ड मध्ये असलेल्या लिलाव भाजी मार्केटला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले लिलाव भाजी मंडी नाव देण्याचा ठराव मंजूर
आज 28 जून दिवशी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय पाचोरा येथे प्रशासकीय मंडळाची सभा पार पडली. या सभेत मार्केट यार्ड मधील लिलाव भाजी मंडईला समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे जनक "क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले" यांचे नाव देण्यात आले. त्या बाबतचा तसा ठराव आज प्रशासकीय मंडळाच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे असलेल्या मार्केटयार्ड मधील लिलाव भाजी मंडई पाचोरा येथे दैनंदिन भाजीपाला विक्री चा लिलाव भरतो तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतातील पिकलेला भाजीपाला आणून या मार्केटमध्ये सर्व व्यापाऱ्यांना लिलाव करतात. दररोज सकाळी चार वाजता येथे भाजी पाल्याचा लिलाव केला जातो. यामध्ये अनेक व्यापारी व शेतकरी दररोज सहभागी होतात.
शहरातील सर्व छोटे- मोठे भाजी विक्रेते या लिलाव मंडई येथे भाजीपाला खरेदी साठी दररोज येत असतात बाजार समितीचे प्रशासक -अनिल भाऊ महाजन यांनी मुख्य प्रशासक दिलीप भाऊ वाघ यांना लेखी पत्र देऊन हा विषय मिटिंग अजेंडावर घेण्या संदर्भात विनंती केली होती. त्या अनुषंगाने सभेमध्ये हा विषय घेण्यात आला. माजी मंत्री राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शना खाली काम करणारे यांचे समर्थक बाजार समितीचे प्रशासक अनिल महाजन यांनी सदर विषय बाबत मार्केट यार्ड मधील लिलाव भाजी मार्केटला "महात्मा ज्योतिबा फुले" यांचे नाव देण्यास बाबतचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला सर्व प्रशाकीय मंडळाने एक मताने होकार दिला मुख्य प्रशासक दिलीप भाऊ वाघ, प्रशासक रणजीत पाटील, चंद्रकांत धनवडे, अभय पाटील,युवराज पाटील, शिवाजी पाटील,या सर्वांनी मोठ्या मनाने सदर प्रस्तावाला संमती दर्शवली व एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
अनिल महाजन यांनी यावेळी सर्व प्रशासकीय मंडळाचे आभार मानले एक चांगल्या कार्याची सुरुवात पाचोरा बाजार समितीमध्ये नवनियुक्त प्रशासकीय मंडळाने केली या निर्णयामुळे तालुक्यातून व जिल्ह्यातून बहुजन समाजात एक चांगला संदेश गेला व बहुजन समाजातुन सर्व प्रशासकीय मंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे.