Reservation Agitation: आरक्षणातील बेकायदेशीर घुसखोरांविरोधात पोहरागड येथे आंदोलन; आमदार इंद्रनील नाईक यांनी उषोणकर्त्यांना दिली भेट
मानोरा तालुक्यातील पोहरागड येथे भटके विमुक्त प्रवर्गातील घटना दत्त आरक्षणामध्ये काही प्रगत जात समुहाद्वारा बेकायदेखीस मार्गाने होत असलेली घुसखोरी विरोधात आंदोलन सुरु आहे.
Reservation Agitation: राज्यात ठिकठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरु आहेत दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरागड येथे भटके विमुक्त प्रवर्गातील घटना दत्त आरक्षणामध्ये काही प्रगत जात समुहाद्वारा बेकायदेखीस मार्गाने होत असलेली घुसखोरी विरोधात आंदोलन सुरु आहे. मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यानी अन्नाचा त्याग केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राजेश राठोड आणि जालनातील श्याम राठोड, सचिन राडोठ आणि अमोल राठोड हे चार उपोषणकर्ते पोहरागड येथे 25 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसले आहे.
गेल्या चार दिवसांपासून उपोषणकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे अन्न आणि पाणी न पिता उपोषण केले आहे. दरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच आमदार इद्रंनील नाईक आणि त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी पोहरागड येथे उपस्थिती दर्शवली. उपोषणकर्त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली सोबत त्यांना वैद्यकीय सेवा स्वीकारण्याची विनंती इंद्रनील नाईक यांनी केली.
या मागण्या करिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्वरित मागण्या मान्य करण्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून प्रयत्न करणार असे अभिवचन इंद्रनील नाईक यांनी दिले.