Bahraich Shocker: विद्यार्थ्यांशी अश्लील चाळे, मुख्याध्यापक निलंबीत
उत्तर प्रदेश राज्यातील बहरईच येथील एका मुख्यध्यापकाने विद्यार्थ्यांशी अश्लिल चाळे केले, तो वर्गातच नग्न झोपत असे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील बहराइचमधील (Bahraich) विश्वेश्वरगंज येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला निंलबीत करण्यात आले आहे. मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांसमोर नग्न अवस्थेत झोपल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा एक कथित व्हिडिओ देखील सोशल मीडियातून समोर आला आहे. ज्यात दुर्गा प्रसाद जैस्वाल म्हणून ओळखले जाणारे मुख्याध्यापक हे अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. गटशिक्षणाधिकारी यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीच्या आधारे मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता अद्याप निश्चित झालेली नाही. जैस्वाल बहराइचमधील शिवपूर बैरागी प्राथमिक शाळेत नोकरीस आहेत. अनेक संतप्त पालकांनी असा दावा केला की जयस्वाल याने काही पहिल्यांदाच असे केले नाही. तो विद्यार्थ्यांसमोर अनेकदा अश्लील कृत्ये करत असे आणि तो वर्गात कपडे काढून विश्रांती घेत असे. जयस्वाल यांच्या वागण्यामुळे विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केल्याचेही काही पालकांनी सांगितले.
प्रकरण उघडकीस येताच, मूलभूत शिक्षा अधिकारी (BSA) यांनी चौकशीचे आदेश दिले होते, त्यानंतर मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले होते. आम्हाला दुर्गा प्रसाद जैस्वाल यांच्या विरोधात तक्रार मिळाली आहे. ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरने केलेल्या प्राथमिक चौकशीच्या आधारे त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे BSA अव्यक्त राम तिवारी यांनी सांगितले. विभागीय चौकशी केली जात आहे. आवश्यक असल्यास, मुख्याध्यापकावर एफआयआर देखील दाखल केला जाईल, असेही BSA पुढे म्हणाले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, एफआयआर दाखल झाल्यानंतरच पुढील कारवाई होईल. विभागीय चौकशीच्या निष्कर्षांवर आधारित एफआयआर दाखल केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2023 09:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

