लज्जास्पद! पिंपरी चिंचवडमध्ये मावस बहिणींवर लैंगिक अत्याचार करून अपहरण, पाच आरोपींना पोलिसांनी केली अटक
यातील 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिच्या 14 वर्षांच्या बहिणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच करुन हे नराधम थांबले नाही.
महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे स्वरुप दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली आहे. येथे दोघा नराधमांनी आपल्या अल्पवयीन मावस बहिणींवर लैंगिक अत्याचार केला आहे. यातील 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिच्या 14 वर्षांच्या बहिणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच करुन हे नराधम थांबले नाही. यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने या मुलींचे अपहरण केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मात्र सुदैवाने ही बाब काही लोकांच्या लक्षात येताच त्या आरोपींनी तेथून पळ काढला आणि मुलींची सुटका झाली. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे.
ABP माझाने दिलेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. अजंठानगर मध्ये आपल्या घराबाहेर खेळत असलेल्या या मुलींना त्यांच्याशेजारी राहणा-या या आरोपींनी फिरायला जाऊ असे सांगून त्यांना जवळच्या पत्राशेड आणि मोडकळीस आलेल्या जुन्या कंपन्यांच्या परिसरात आले. तेथे त्यांनी 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आणि तिच्या छोट्या बहिणीचा विनयभंग केला.
हेदेखील वाचा- Nirbhaya Gang Rape Case: दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला आज 8 वर्षे पूर्ण, आईने व्यक्त केली 'ही' खंत
एवढंच करुन ते थांबले नाही. या दोघांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने या मावस बहिणींना घेऊन जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आले. मग दोघांनी तिथं निवास सुतार (वय 20), तेजस वाघमारे (वय 19) आणि कार्तिक उर्फ टिंक्या चव्हाण (वय 21) या तिघांना बोलावून घेतलं. कारमध्ये ते तिथं पोहचताच दोघींना जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि तिथून काही अंतरावर असलेल्या चिंचवड स्टेशन चौकात गाडी थांबवली. तेव्हा काही कारणास्तव त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्या मुलींची तेथून सुटका झाली.
मग त्या मुलींनी स्वत:ची कशीबशी सुटका करून घरी पोहोचल्या. घडलेला प्रकार कुटूंबियांच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी कुटूंबियांसह पोलिस स्टेशनात तक्रा दाखल केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्काळ या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2020 01:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

