Stan Lee यांना खास व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांची आदरांजली
आबालवृद्धांना मार्व्हल कॉमिक्सचं वेड लावणाऱ्यांना स्टेन ली यांना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या व्यंगचित्रातून खास आदरांजली वाहिली आहे.
स्पायडर मॅन, हल्क, ब्लॅक पँथर यासारख्या सुपरहिरोंना जगात प्रसिद्ध करणाऱ्या स्टेन ली (Stan Lee) यांनी आठवड्याभरापूर्वी या जगाचा निरोप घेतला. आबालवृद्धांना मार्व्हल कॉमिक्सचं वेड लावणाऱ्यांना स्टेन ली यांना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या व्यंगचित्रातून खास आदरांजली वाहिली आहे. स्टेन ली सुपरहिरोंच्या समोर पृथ्वीचा निरोप घेत असल्याचे खास व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हे व्यंगचित्र शेअर देखील केलं आहे.
स्टेन ली एक चित्रपट निर्माते होते. भारतामध्येही त्यांनी निर्माते म्हणून काम केले होते. मार्व्हल कॉमिक्सच्या सोबतीतीने काही ऍनिमेशनपाटांमध्येही त्यांनी विशेष योगदान दिले होते. वयाच्या व्या वर्षी वृद्धत्वामुळे ढासळलेल्या प्रकृतीमुळे त्यांचे निधन झाले.
राजकारणाव्यतिरिक्त व्यंगचित्रकला हे राज ठाकरेंचे पॅशन आहे. त्यांना वोल्ट डिस्नेमध्ये काम करण्याची इच्छा होती. दिवाळीच्या दरम्यानही राज ठाकरेंनी राजकीय परिस्थितीवर टीका करणारी व्यंगचित्रांची मालिका सोशल मीडियाद्वारा शेअर केली होती.