सरकारचे वाभाडे काढण्यासाठी 'शॅडो कॅबिनेट'ची स्थापना, पण चांगल्या कामाचं कौतुकही करायचं - राज ठाकरे
या कार्यक्रमात मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं. सरकारचे वाभाडे काढण्यासाठी या 'शॅडो कॅबिनेट' मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु, सरकारच्या चांगल्या कामाचं कौतुकही करायचं, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 14 वा वर्धापन दिन आज नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. या कार्यक्रमात मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं. सरकारचे वाभाडे काढण्यासाठी या 'शॅडो कॅबिनेट' (Shadow Cabinet) मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु, सरकारच्या चांगल्या कामाचं कौतुकही करायचं, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
आज मनसेने 14 वर्षांचा प्रवास पूर्ण केला केला आहे. या 14 वर्षांत मनसेला अनेक चढ-उतार पाहावे लागले. या 14 वर्षांत माध्यमांनी प्रेम दिलं. काहींनी बोचरी टीकाही केली, परंतु हे सर्व चालायचचं. काँग्रेस पक्षाने केंद्रात अनेक वर्ष सत्ता गाजवली. परंतु, दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. जेव्हा देशात लाट असते तेव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी देखील मलाही विचारतात की तुमचा पराभव का झाला? इतक्या चढ उतारानंतरही तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत राहिलात ह्याचा मला अभिमान वाटतो, असंही राज ठाकरे यावेली म्हणाले. (हेही वाचा - मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर: जाणून घ्या अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, अनिल शिदोरे आदी नेत्यांकडे कोणती जबाबदारी)
गेल्या 14 वर्षात मनसेने अनेक कामं केली. परंतु, मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात? हे कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत. मात्र, मतदान आम्हाला नाही करणार याला काय अर्थ आहे? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 25 तारखेला शिवतीर्थावर मी अनेक विषयावर भाष्य करणार आहे, असंही ठाकरे म्हणाले. तसेच पक्षातील पदाधिकाऱ्याव्यतिरिक्त कोणाला मंत्रीमंडळात सहभागी व्होयचं असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.