Raj Thackeray यांना टेनिस खेळताना दुखापत; डावा हात फ्रॅक्चर!
पण सूज आल्याने हाताला वेदना जाणवत होत्या. त्यांच्या हातावर हिंदुजा हॉस्पिटल मध्ये उपचार झाले यावेळेस त्यांच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने तो प्लॅस्टरमध्ये ठेवण्यात आला आहे.
नवी मुंबई, कल्याण डोंबिवली सह आगामी 5 महापालिका निवडणूकांची रणनीती ठरवण्यासाठी आज मनसे नेते, कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एक बैठक होती. या बैठकीला उशिराने पोहचलेल्या राज ठाकरेंचा एक हात फ्रॅक्चर होता. राज ठाकरेंना असं त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना काळजी वाटत होती. पण मीडीया रिपोर्ट्सनुसार, राज ठाकरे यांच्या हाताला फ्रॅक्चर आहे. सोमवारी टेनिस खेळताना त्यांच्या हाताला दुखापत झाली आणि त्यांचा डावा फ्रॅक्चर झाला आहे. Raj Thackeray & Amit Thackeray On Tennis Court: राज ठाकरे यांचा अमित ठाकरे यांच्यासोबत रंगला डाव; फोटो सोशल मीडियावर व्हायरल.
दरम्यान न्यूज नेटवर्क 18 च्या वृत्तानुसार, राज ठाकरेंच्या हाताला झालेली दुखापत फार गंभीर नाही. पण सूज आल्याने हाताला वेदना जाणवत होत्या. त्यांच्या हातावर हिंदुजा हॉस्पिटल मध्ये उपचार झाले यावेळेस त्यांच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने तो प्लॅस्टरमध्ये ठेवण्यात आला आहे. दरम्यान डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्याने पुढील काही बैठका कृष्णकुंजवर त्यांच्या निवासस्थानीच होणार आहेत.
राज ठाकरे मागील काही दिवस नियमित शिवाजी पार्क मध्ये टेनिस खेळायला जातात. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे तसेच पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबतची ते टेनिस खेळताना दिसले होते. असेच खेळता खेळता आता त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी राज ठाकरे यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला टेनिस एल्बोचा त्रास उद्भवला होता. त्यावेळी देखील त्यांच्या हाताला सपोर्टर लावण्यात आला होता. टेनिस एल्बोचा त्रासदेखील वेदनादायी असतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर देखील या टेनिस एल्बोच्या त्रासातून गेला आहे.