Raj Thackeray Gudi Padwa Speech: 'बाळासाहेबांना सोडून कुणाला 'धनुष्य' पेलणार नाही'; शिवसेनेती फूट, सत्तांतर ते माहीम मध्ये उभारला जात असलेला अनधिकृत दर्गा पहा राज ठाकरेंनी केलेले महत्त्वाचे गौप्यस्फोट

यामध्ये शिवसेनेच्या राजकारणाचा शेवट म्हणजे एकनाथ शिंदे यांचे आमदार, खासदार फोडून बाहेर पडणं हा होता असं म्हटलं आहे.

Raj Thackeray | Twitter/ANI

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपण कडवट हिंदू आणि मराठी घरात जन्माला आलो असल्याचा पुनरूच्चार कालच झालेल्या त्यांच्या मुलाखतीमध्ये केल्यानंतर आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर आयोजित मनसेच्या सभेत कुणावर ते बरसणार याची उपस्थितांना उत्सुकता होती. दरम्यान राज ठाकरेंच्या सभेची सुरूवात उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यापासून सुरू झाली ते शेवट माहिम जवळ समुद्रात एक अनधिकृत दर्गा उभी राहत आहे आणि कुणाचचं त्याच्याकडे लक्ष कसं नाही? असं विचारत झाला आहे. सरकारला राज ठाकरे यांनी या अनधिकृत कामाला हटवण्यासाठी महिनाभराचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा त्याच्या शेजारी मोठं गणपतीचं मंदिर उभारू असा इशारा दिला आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी आजच्या गुढीपाडव्याच्या सभेत काही गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या राजकारणाचा शेवट म्हणजे एकनाथ शिंदे यांचे आमदार, खासदार फोडून बाहेर पडणं हा होता असं म्हटलं आहे. शिवसेना माझी की तुझी यावरून सुरू असलेली खेचाखेच पाहणं त्रासदायक असल्याचं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही राज्याच्या भल्यासाठी काम करण्याचा सल्ल्ला दिला आहे. Raj Thackeray Gudi Padwa Melava Shivaji Park: 'राज ठाकरे जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री'; मुंबईतील सभेपूर्वी 'मनसे'कडून बॅनरबाजी .

लोकं शिवसेतून बाहेर कशी पडतील हे पाहणं; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

राज ठाकरे यांनी उद्ध्व ठाकरे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर घणाघात करत भाषणाची सुरूवात केली आहे. दरम्यान आपण स्वतः उद्धव ठाकरे यांना एका हॉटेल मध्ये समोरासमोर बसवून त्यांना नेमकं काय हवंय हे विचारलं होतं. माझा पक्षात काय रोल असेल याची स्पष्ट विचारणा केली होती. बाहेर बोलून आम्ही सारे नीट केलं आहे असं बाळासाहेबांना सांगितलं. पण हे बाळासाहेबांसमोर सांगण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे परस्पर बाहेर निघून गेले असं राज ठाकरे म्हणाले आहेत. आपण शिवसेनेतून बाहेर पडावं ही त्यांचीच इच्छा होती असा आरोप राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडलेच नसते

नारायण राणे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याचं खापरही राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे बोलताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर फोडलं आहे. बाळासाहेबांशी बोलून आपण नारायण राणे यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असताना काहींनी खोडा घातल्याचं ते म्हणाले

माहिम परिसरात समुद्रात अनधिकृत दर्गा

माहिम च्या समुद्रात अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी सभेत स्क्रिनवर त्याचा एक व्हिडिओ दाखवला आहे. यावर सरकारने तातडीने कारवाई करावी. महिनाभरात ती हटवली नाही तर मनसे तिथे गणपतीचं मंदिर उभारेल असं म्हटलं आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या या इशार्‍यानंतर पोलिस आयुक्तालय तातडीने कामाला लागलं आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर देखील उद्या सकाळी या जागेला भेट देऊन पाहणी करणार असल्याचं म्हणाले आहेत.

दरम्यान संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांची पक्षात नेतेपदी नेमणूक जाहीर झाली आहे. संदीप देशपांडेंनी देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. बाळ नांदगावकर यांनीही युतीचा प्रस्ताव घेऊन गेल्यावर आपल्याला तुम्हीच शिवसेनेमध्ये या असं सांगण्यात आल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मोठ्या भावाच्या मनात कधीच लहान भावाबद्दल प्रेम नव्हतं असं म्हटलं आहे.