Raigad Loksabha Constituency Loksabha Election 2019:रायगडचा गड राखण्यासाठी अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यात चुरशीची लढत, मतांची चढाओढ कायम .
महाराष्ट्रातील महत्वाचा रायगड मतदारसंघात यंदा देखील शिवसेना पक्षाचे विद्यमान खासदार अनंत गीते यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांची मतांसाठीची जोरदार लढत पाहायला मिळाली.
आज लोकसभेच्या 17 व्या निवडणूक (17th Loksabha Election) पर्वातील बहुप्रतीक्षित निकालाचा (Loksabha Results) दिवस असल्याने सकाळ पासूनच प्रत्येक भारतीयामध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.काहीच वेळापूर्वी देशभरातील मतदार संघांमध्ये मतमोजणीची सुरवात झाली असून निकाल देखील हाती येऊ लागले आहेत. महाराष्ट्रातील 48 मतदार संघांमधील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. महाराष्ट्रातील महत्वाचा रायगड मतदारसंघात (Raigad Loksabha Constituency) यंदा देखील शिवसेना पक्षाचे विद्यमान खासदार अनंत गीते (Anant Geete) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची मतांसाठीची जोरदार लढत पाहायला मिळाली. यापूर्वी 2014 च्या निवडणुकीत देखील या दोन उमेदवारांची लढत बहुचर्चित ठरली होती. मात्र यावेळी वंचित बहुजन परतीच्या सुमन कोळी (Suman Koli) यांनी देखील जोरदार टक्कर दिली आहे.
जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स
रायगड विभाग हा कोकण पट्ट्यातील विस्तरित प्रदेश म्हणून ओळखला जातो, रायगडच्या हददीत एकूण पंधरा तहसीलदार विभाग असून साधारण 7,149 किमी इतका विस्तृत परिसर आहे.मुंबई हार्बर मार्गावरील पूर्वेकडील भाग देखील रायगड जिल्ह्यातच गणला जातो. सद्य निवडणुकीत रायगड मतदारसंघात महाराष्ट्र्राच्या विधानसभेतील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर असे एकूण सहा मतदारसंघ समाविष्ट आहेत. Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी
रायगड मधील प्रमुख मताधिक्याची लढत पाहायला गेल्यास हा मतदारसंघ शिवसेनेचे अनंत गीते यांचा बालेकिल्ला आहे असे म्हणायला हरकत माजी. 2009 व 2014 दोन निवडणुकीत अनंत गीतेंनी मतांच्या पुष्कळ फरकाने आपला गड राखला होता. यंदाची अनंत गीतें यांने सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र यंदा गीतेचा मार्ग थोडा बिकट झालेला दिसून येत आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणजेच राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी निवडणूक उमेदवारी जाहीर होताच जोरदार प्रचाराला सुरवात केली होती.दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी सामान्य नागरिकांची प्रत्यक्ष व सभांमधून भेट घेत पारंपरिक पद्धतीने प्रचार करण्यात आला होता.
दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेससाठी प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे. आज सुरू असलेल्या मतमोजणी मध्ये देखील शिवसेना व राष्ट्रवादी मध्ये मतांची चढाओढ दिसून येतेय. मात्र वंचित बहुजन परतीच्या सुमन कोळी मात्र लढतीत मागे पडताना दिसत आहेत.