वीर सावरकर यांच्याबाबत छगन भुजबळ यांचे मोठे विधान; राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर साधला भाजपवर निशाणा

राहुल गांधींनी महिलांचा अपमान केला आहे. तसेच यासंदर्भात राहुल गांधींनी माफी मागावी, अशी भुमिका भाजप (BJP) नेत्यांनी मांडली होती.

Chhagan Bhujbal (Photo Credit: ANI)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी झारखंड येथील एका सभेत रेप ईन इंडिया असे वक्तव्य केले होते. राहुल गांधींनी महिलांचा अपमान केला आहे. तसेच यासंदर्भात राहुल गांधींनी माफी मागावी, अशी भुमिका भाजप (BJP) नेत्यांनी मांडली होती. यानंतर काँग्रेसकडून दिल्ली येथील रामलीला मैदानात भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही तर, राहुल गांधी आहे, असे राहुल गांधीनी विधान केले होते. यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांसह राजकारणही तापले आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वीर सावरकर यांच्याबाबतीत मोठे विधान करुन भाजपवर निशाणा साधला आहे. वीर सावरकर गायीला माता मानत नव्हते, तर भाजप हे मान्य करेल का? असा प्रश्न विचारुन छगन भुजबळ यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आपले मत मांडले आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "जेव्हा मोठ्या व्यक्तींची चर्चा होते तेव्हा प्रत्येकजण सर्वच गोष्टींवर सहमत नसतो. राहुल गांधी यांचे सावरकरांबद्दलचे त्यांचे स्वतःचे विचार आहेत. सावरकर म्हणाले होते की, गाय आमची आई नाही तर भाजप म्हणते आहे. सावरकरांचा विचारही 'ज्ञानवादी' होता. पण भाजपला ते मान्य करेल का? ते करू शकत नाहीत", असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मातोश्रीबाहेर निषेध करणाऱ्या PMC बॅंकेतील ठेवीदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

एएनआयचे ट्वीट-

राहुल गांधी यांच्या वक्तव्याला भाजपसह शिवसेनाही विरोध केला आहे. शिवसेना संजय राऊत म्हणाले होते की, आम्ही पंडीच जवाहरलाल नेहरु यांचा सन्मान करतो. तसेच इतरांनीही वीर सावरकर यांचा सन्मान करावा, असे आम्हाला वाटते. वीर सावरकर केवळ महाराष्ट्राचे नसून संपूर्ण देशासाठी त्यांनी मोठे योगदान दिल्याचे संजय राऊत त्यावेळी म्हणाले होते.