Ulhasanagar Crime: बर्थडे पार्टीत झाला राडा, रागातून मित्राला चौथ्या मजल्यावरून फेकले, उल्हासनगर येथील घटना

बर्थ डे हा सगळ्यांचा स्पेशल असतो. मित्र मैत्रिणीसोबत हा दिवस साजरा केला जातो. उल्हासनगर येथे मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणं हे बर्थ डे बॉयला महागात पडले आहे.

Ulhasanagar Crime: बर्थडे पार्टीत झाला राडा, रागातून मित्राला चौथ्या मजल्यावरून फेकले, उल्हासनगर येथील घटना
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Ulhasanagar Crime: बर्थ डे हा सगळ्यांचा स्पेशल असतो. मित्र मैत्रिणीसोबत हा खास दिवस साजरा करत भरपूर मज्जा मस्ती करत असतो. परंतु उल्हासनगर येथे मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणं हे 'बर्थ डे बॉय महागात पडले आहे. विठ्ठलवाडीत वाढदिवसांच्या दिवशींच बर्थ डे बॉयची हत्या (Birthday Boy Murder) केली आहे. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा- लोंखडी रॉड डोक्यात घालून ग्राहकाची केली हत्या, दुकानमालकासह मुलांना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक वायाळ असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. चिंचपाडा येथील कार्तिक त्यांचा वाढदिवस निमित्त मित्रांना पार्टी देत होता. पार्टीनिमित निलेश क्षीरसागर, सागर काळे, धीरज यादव जमले. चिंचपाडा येथील आर्या अपार्टमध्ये चौघे जण पार्टीसाठी आले. निलेश क्षीरसागर याचा फ्लॅट चौथ्या मजल्या होता. दारूवरून चौघांमध्ये वाद झाला होता.

हा वाद इतका टोकाला गेला की, कार्तिक यांने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. याचा राग निलेश आणि त्याच्या इतर मित्रांना देखील आला. रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत निलेशला तिघांन्ही मिळून चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोपी निलेशने कार्तिकच्या मृत्यू बद्दल वडिलांना बनाव रचून सांगितला. त्याने सांगितले की, कार्तिकने निलेशच्या डोक्यात बाटली फेकून मारली त्यामुळे तो जखमी झाला. जखमीला रुग्णालयात घेऊन गेलो. घरी येऊन पाहतो तर कार्तिक हा इमारतीच्या खाली मृतावस्थेत दिसला. या घटनेनंतर हताश वडिलांनी निलेशवर संशय घेतला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा केला.

तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीत निलेशने गुन्ह्याची कबुली दिली.  विठ्ठवाडील पोलिसांनी तिघांना अटक केले. पोलिसांनी कार्तिकचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2024 10:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).