Pune To Prayagraj Flight: महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या पुणेकरांसाठी खुशखबर! Akasa Air ने सुरु केली पुणे ते प्रयागराज उड्डाणे, जाणून घ्या वेळा

यंदा प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभ मेळा 13 जानेवारी 2025 पासून 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत आयोजित केला जात आहे. आता महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या पुणेकरांसाठी (Pune) आनंदाची बातमी आहे. आकासा एअरने पुण्याहून दिल्लीमार्गे प्रयागराजपर्यंत दैनंदिन उड्डाणे सुरू केली आहेत.

Akasa Airlines (PC - Wikimedia Commons)

महाकुंभ मेळा (Maha Kumbh Mela 2025) हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण उत्सव आहे, जो 12 वर्षांच्या चक्रानुसार आयोजित केला जातो. या काळात लाखो भक्त गंगा, यमुना आणि काल्पनिक सरस्वती नद्यांच्या संगमस्थळी स्नान करून आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करतात. महाकुंभ मेळा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे, ज्यामध्ये देश-विदेशातील लाखो लोक सहभागी होतात. यंदा प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभ मेळा 13 जानेवारी 2025 पासून 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत आयोजित केला जात आहे. आता महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या पुणेकरांसाठी (Pune) आनंदाची बातमी आहे. आकासा एअरने पुण्याहून दिल्लीमार्गे प्रयागराजपर्यंत दैनंदिन उड्डाणे सुरू केली आहेत. ही उड्डाणे 28 जानेवारीपासून सुरू झाली असून 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहतील.

विमानाच्या वेळा-

फ्लाइट क्रमांक QP 1807 पुण्याहून सकाळी 7:30 वाजता उड्डाण करेल, दिल्लीत सकाळी 9:45 वाजता पोहोचेल. पुढे दिल्लीहून सकाळी 10:50 वाजता निघेल आणि दुपारी 12:15 वाजता प्रयागराजमध्ये उतरेल.

परतीचे फ्लाइट क्रमांक QP 1808 प्रयागराज येथून दुपारी 12:05 वाजता उड्डाण करेल, दुपारी 2:20 वाजता दिल्लीला पोहोचेल, नंतर दिल्लीहून दुपारी 3 वाजता सुटेल आणि संध्याकाळी 5:15 वाजता पुण्यात उतरेल.

केवळ पुण्यातूनच नाही तर, आकासा एअरने हैदराबाद, अहमदाबाद आणि बेंगळुरूसह इतर तीन शहरांमधून प्रयागराजसाठी उड्डाणे सुरू केली आहेत. याबद्दल बोलताना, आकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी प्रवीण अय्यर यांनी एअरलाइनच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक कार्यक्रमांपैकी एक आहे आणि यात्रेकरूंसाठी त्याचे महत्त्व आम्हाला समजले आहे. लाखो भाविकांना या उत्सवात सामील होता यावे यासाठी, वर्धित, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या प्रवासाच्या पर्यायांद्वारे देशाला एकत्र बांधण्यात सक्षम झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे.’ (हेही वाचा: Mahakumbh 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संतांसह केले त्रिवेणी संगमात पवित्र स्नान)

Pune To Prayagraj Flight:

दरम्यान, या महोत्सवात विविध धार्मिक विधी, साधू-संतांची शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आध्यात्मिक चर्चासत्रे आयोजित केली जातात. विशेषतः, 'शाही स्नान' हा महत्त्वपूर्ण विधी असतो, ज्यामध्ये नागा साधू आणि विविध आखाड्यांचे संत सहभागी होतात. महाकुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी उत्तर प्रदेश सरकारने व्यापक तयारी केली आहे. यामध्ये तात्पुरत्या निवासस्थाने, रस्ते, पूल, रुग्णालये आणि स्वच्छतेची व्यवस्था यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी 50,000 पेक्षा अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement