Coronavirus in Pune: पुण्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा 1 लाखांच्या पार- महापौर मुरलीधर मोहोळ

Murlidhar Mohol (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांना सुद्धा स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला कोविड वॉरिअर्स सुद्धा आपले कर्तव्य चोखपणे बजावताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभुमीवर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोविड19 च्या संक्रमितांचा आकडा 1 लाखांहून अधिक असल्याची माहिती खुद्द महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

मोहोळ यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, सध्या ऑक्सिजनयुक्त बेड्स, वेंटिलेटर्स आणि कर्मचाऱ्यांना नेमण्याकडे आमचा अधिक कल आहे. त्याचसोबत अशा कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येणार आहे ज्यांना या सर्व उपकरणांबद्दल माहितीसह हाताळता येत असावे. पैशांसंबंधित कोणताही अभाव ही नाही आहे. या व्यतिरिक्त पुणे महापालिकेने यासाठी 300 कोटी रुपयांचा खर्च केल्याचे ही मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.(औरंगाबाद मध्ये कोरोनाचा कहर! रुग्णांचा आकडा 24 हजारांच्या पार)

पुण्यात प्रशासनाकडून वाघोली गावात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामसेवक कुंभार यांनी असे म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या 3 महिन्यात 28 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झली आहे. तर जुलै-ऑगस्टमध्ये 210 आणि 300 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 18221 वर पोहचला असून 4160 जणांचा बळी गेला आहे. तसेच 54760 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 123292 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना व्हायरसने राज्यातील अन्य भागात सुद्धा थैमान घातले असून तेथील प्रशासन सुद्धा त्याच्या विरोधात लढण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत.