Pune Shocker: भांडणात पत्नीने तोंडावर ठोसा मारल्याने पतीचा दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना

पुणे शहरात पत्नीने रागाच्या भरात पतीला तोंडावर ठोसा मारला. मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pune Shocker: भांडणात पत्नीने तोंडावर ठोसा मारल्याने पतीचा दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना
Wife Beating Husband | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

Pune Shocker: पुणे (Pune) शहरात पत्नीने रागाच्या भरात पतीला तोंडावर ठोसा मारला. मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे शहरातील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अवघ्या क्षुल्लक कारणांनी दोघांमध्ये भांडणातून वाद झाला आणि पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. नाकातून अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांला गंभीर जखम झाली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती भांडणातून वानवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे. काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. निखिल पुष्पराज खन्ना ३६ असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रेणुका निखिल खन्ना असं आरोपी महिलेचे नाव आहे. दोघांच सहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. दुपारी त्यांच्यात भांडण झालं आणि पत्नीनं रागाच्या भरात पतीला तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर त्यांच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव सुरु झाला. महिलेने डॉक्टर असलेले सासरे  यांना फोन करून याची माहिती दिली. सासरे घरी येऊन निखिलला तपासतात, निखिल यांना सीपीआर देण्याता प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही आणि त्यांचा मृत्यू होतो.

ही माहिती पोलिसांना देण्यात आली.वानवडी पोलिसांनी रेणुका खन्ना हीला ताब्यात घेतले आणि अधिक तपास सुरु केला. निखिल हा व्यवसायाने बिल्डर होता. रेणुका दारूच्या नशेत असल्याचं पोलिसांना संशय आला. पोलिस कंबर कसून चौकशी करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2023 10:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).