Pune Shocker: पुण्यात 10 वर्षांच्या मुलीवर 67 वर्षीय व्यक्तीचे लैंगिक अत्याचार; शाळेतील 'गुड टच-बॅड टच' वर्कशॉपद्वारे समोर आला धक्कादायक प्रकार
या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पुण्यात (Pune) एका 10 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, एका 67 वर्षीय व्यक्तीने पाचवीमाध्येब शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य केले. पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिलीप नामदेव नावाच्या वृद्धाला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा विचार करून शनिवारी शाळेत 'गुड टच' आणि 'बॅड टच' (Good Touch-Bad Touch) या विषयावर कार्यशाळा सुरू होती. यावेळी विद्यार्थिनीने तिच्या शिक्षिकेला एका काकाने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगितले.
विद्यार्थिनीने शिक्षिकेला सांगितले की, काकांनी तिला घरी नेले आणि जेवणाचे पैसे देऊन तिच्यासोबत गैरकृत्य केले. विद्यार्थिनीनी सांगितलेली गोष्ट ऐकून शिक्षिकेला धक्का बसला. त्यानंतर तिने हा प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. नंतर मुलीच्या पालकांना तातडीने शाळेत बोलावून याबाबत माहिती देण्यात आली. शिक्षक संघटनेच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (हेही वाचा; Minor Girl Gangraped In Washim: धक्कादायक! वाशिममध्ये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; सर्व आरोपींना अटक)
कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर देशभरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. त्यांनतर बदलापूर येथून दोन अल्पवयीन मुलींवर आदर्श शाळेत अत्याचार झाल्याचे समोर आले. असे असताना अजूनही देशाच्या कानाकोपऱ्यातून महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या येत आहेत.