Pune: शेअर बाजारात पैसे लावून भरघोस रिटर्न मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा, नवरा-बायकोकडून उकळले तब्बल 65 लाख रुपये
तर शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास भरघोस रिटर्न मिळवून देण्याच्या नावाखाली दांपत्याने चुना लावला आहे.
महाराष्ट्रातील पुणे (Pune) येथील एका दांपत्याकडून नवरा-बायकोची तब्बल 65 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास भरघोस रिटर्न मिळवून देण्याच्या नावाखाली दांपत्याने चुना लावला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदूस्थान टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, पोलीसांनी असे म्हटले की आरोपींची नावे संतोष काचरु भांगरे आणि छाया भांगरे अशी आहेत. ओल्ड सांगवी स्थित या दांपत्याने पीडित दांपत्याला त्यांची ओळख सिव्हिल इंजिनिअर असल्याचे सांगितली होती. तसेच आम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करतो त्यामुळे भरघोस रिटर्न सुद्धा मिळतात असे त्यांना सांगण्यात आले होते.
सुरेखा दीपक जगताप आणि तिचा नवरा दीपक जगताप यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे. आरोपीने दांपत्याने पीडितांना असे म्हटले होते की, त्यांना गुंतवणूकदारांची गरज आहे. याच्या बदल्यात त्यांना उत्तम रिटर्न मिळेल हे सुद्धा पटवून दिले. त्यामुळे जगताप गुंतवणूक करण्यास सहमत झाले आणि त्यांनी एका स्टॅम्प पेपरवर एका करारावर सही केली. आरोपी दांपत्याने 2017 मध्ये कंपनीमध्ये 65,66,520 रुपयांची गुंतवणूक केली.(धक्कादायक! दक्षिण मुंबईतील कोविड सेंटर मधील रुग्णाने चाकूने केला परिचारिकेवर हल्ला, IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल)
तक्रारीनुसार, काही काळानंतर आरोपी दांपत्याला त्यांचे पैसे परत करणे जमले नाही. रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी सांगवी पोलीस स्थानकात कलम 406 आणि 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस स्थानकातील असिस्टंट पोलीस अधिकारी सतील कांबळे यांच्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.