Pune Porsche Crash Inside Story: 110 च्या स्पीडने आदळली पोर्श, पोलिसांकडूनही घडल्या चुका; पुणे अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची माहिती

या वेळी विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या अपघाताबद्दल सविस्तर माहिती (Pune Porsche Crash Inside Story) सभागृहाला दिली.

Pune Porsche Crash | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुणे येथील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्श कार अपघात (Pune Porsche Car Crash) प्रकरणाचे जोरदार पडसाद आज (28 जून) राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. या वेळी विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या अपघाताबद्दल सविस्तर माहिती (Pune Porsche Crash Inside Story) सभागृहाला दिली. त्यांनी सांगितले की, अपघात घडला तेव्हा अल्पवयीन आरोपी कार चालवत होता. तो मद्यधूंद होताच पण तो चालवत असलेल्या कारचा वेगही प्रचंड होता. तो चालवत असलेली पोर्श कार ही तब्बल प्रति तास 110 किलोमीटर वेगाने धावत होती, असे त्यांनी सांगितले. याच वेळी पुणे पोलिसांकडूनही काही चुका झाल्याची प्रांजळ कबुलीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी सभागृात माहिती देताना फडणवीस यांनी या संपर्ण प्रकरणाची इनसाईड स्टोरी सांगितली.

''चुका झाल्या पण लक्षात येताच त्या दुरुस्त केल्या''

देवेंद्र फडणवीस यांनी सागितले की, अल्पवयीन आरोपीकडून झालेल्या पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी राज्य सरकारने कोणतीही दिरंगाई अथवा सवलत, मदत केली नाही. या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात आली. काही प्राथमिक पातळीवर नक्कीच चुका झाल्या. पण त्या लक्षात येताच दुरुस्त करण्यात आल्या. हे हायप्रोफाईल प्रकरण असल्याचे लक्षात येताच ससूनमधल डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपी असलेल्या मुलास वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. त्यावर बोलताना फडणीस म्हणाले, अपवाद वगळता या प्रकरणात संबंधित आरोपींवर योग्य कारवाई करण्यात आली. त्यात कोणत्याही प्रकारे दिरंगाई करण्यात आली नाही. अल्पवयीन मुलाने केलेले कृत्य क्रूर आहे. परंतू, त्याचे वय 17.8 महिने इतके आहे. त्यामुळे त्याचे वय अल्पवयीन गटात मोडते. पण असे असले तरी, बालहक्क न्यायालयाच्या कलम 20 नुसार त्याला सज्ञान समजून हे प्रकरण कोर्टाकडे वर्ग करण्यात यावे, अशी विनंती पोलिसांनी सुरुवातीलाच केल्याचे देवेंद्र फडणवीस सभागृहाला सांगितले. (हेही वाचा, Porsche On Pune Accident: 'पोर्श कारमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या नव्हती', पुणे अपघात प्रकरणी कंपनीकडून स्पष्टोक्ती)

''110 च्या स्पीडने धावत होती पोर्श कार''

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुणे येथे पोर्श कार अपघात घडल्यानंतर पुढच्या काहीच काळात क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसस करण्यात आले. त्यामध्ये बरीच माहिती पुढे आली. या अॅनेलीसीसचा अहवाल सांगतो की, अपघात घडला तेव्हा वाहनाचा वेक प्रति तास 110 किलोमीटर इतका होता. अपघात घडला तेव्हा लॉक झालेले स्पीड 110 इतके होते. पोलिसांनी अल्पवयीन आरोपी असलेल्या मुलाच्या घरापासून ते अपघात स्थळापर्यंतचे उपलब्ध झालेले सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. त्यामध्येही बराच खुलासा झाला, असे ते म्हणाले. (हेही वाचा, Pune Drugs Case: अंमली पदार्थांचा विळखा; Private Detective द्वारे मुलांवर नजर, पुणे येथील पालकांचा प्रताप)

''रक्ताचा नमुना बदलण्यासाठी घेतले 3 लाख रुपये''

अल्पवयीन मुलगा घरातून बाहेर पडला तेव्हा तो बारमध्ये गेला. तेथे त्याने आपल्या मित्रांसोबत मद्यसेवन (दारु) केले. त्याने ज्या बारमध्ये दारु प्यायली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि बिलही पोलिसांनी जप्त केले आहे. त्यामुळे सरकारकडे कोणत्याही प्रकारची तांत्रिक माहिती अथवा पुराव्यांची कमी नाही, असे फडणवीस म्हणाले. आरोपी वेगाने वाहन चालवत होता हे तर निश्चितच आहे. पण, मुलाचा अल्कोहोल रिपोर्ट निगेटव्ह आला तेव्हा पोलिसांना शंका आली. त्यामुळे पोलिसांनी मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा DNA आणि तपासण्यात आलेल्या रक्ताचा नमुना यांचाही डीएनए तपासला. दोन्ही डीएनए जुळले नाहीत. त्यामुळे मुलाचे रक्त आणि नमुना तपासण्यासाठी घेतलेले रक्त वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात तत्काळ कारवाई करुन ससूनमधील डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एका डॉक्टरने रक्ताचा नमुना बदलण्यासाठी 3 लाख रुपये घेतल्याची कबुलीही दिल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.  (हेही वाचा, Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, 2 डॉक्टरांना अटक )

व्हिडिओ

पोलिसांच्या चुका, फडणवीसांची कबुली

दरम्यान, पुणे पोलिसांकडून पोर्श अपघात प्रकरणात काही चुका झाल्याचे कबूल करत देवेंद्र फडणवीस म्हाणाले, या प्रकरणात मुलाला जेव्हा पहाटे 3 वाजता पोलीस स्टेशनला आणले तेव्हाच त्याला वैद्यकीय तपासणीसाठी न्यायला हवे होते. पण, पोलिसांनी तसे केले नाही. तसेच, त्याबाबतची माहितीही वरिष्ठांना दिली गेली नाही. दुसऱ्या बाजूला त्याला सकाळी 8 वाजता वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. अशा प्रकरणांमध्ये पोलीस शक्यतो 304 कलम लावतात, पण तेव्हा पोलिसांनी 304 अ कलम लावले. वरिष्ठांकडून सूचना मिळाल्यावर त्यांनी कलम बदल करुन पुन्हा आवश्यक कलम लावण्यात आली. त्याची नोंद पोलीस डायरीत आहे. कामात कुचराई करणाऱ्या संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले.