पुणे: राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन; सामाजिक अंतर आणि सॅनिटाइजरचा वापर न केल्याप्रकरणी दारुच्या 9 दुकानांवर कारवाई
यादरम्यान, अनेक गोष्टींसाठी सूट देण्यात आली आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीनही झोनमध्ये दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) आजपासून लॉकडाऊन (Lockdown) 3.0 सुरु झाले आहे. यादरम्यान, अनेक गोष्टींसाठी सूट देण्यात आली आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीनही झोनमध्ये दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे तळीरामांनी दारुच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, पुणे शहरात राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. यामुळे सामाजिक अंतर (Social Distancing) आणि सॅनिटाइजरचा (Sanitsation) वापर न केल्याप्रकरणी पुण्यातील (Pune) 9 दारूच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात दारु विक्रीला अनेक समाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच दारु खरेदी करण्यासाठी तळीराम मोठ्या संख्येने गर्दी करु लागल्याने कोरोना विषाणूचा अधिक प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या काळात प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन आहेत. राज्यात जवळपास दीड महिनापासून अधिकृत दारू विक्री बंदी होती. मात्र, लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हरयाणा, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांनी दारू विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी परवानगीमुळे लॉकडाऊनच्या आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यात दारूचा व्यवसाय तेजीत आला आहे. एवढेच नव्हेतर, सोमवार 4 एप्रिलपासून एनेक ठिकांणी तळीरामांनी दारू खरेदीसाठी लांबच लांब रागा पाहायला मिळत आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात 841 नव्या रुग्णांसह कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 15,525 वर
एएनआयचे ट्विट-
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. पुणे शहरात आतापर्यंत एकूण 2 हजार 018 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 113 जणांचा मृत्यू झाले आहे. तर, 425 जण कोरोनामुक्त झाले आहेत.