Pune News: लग्नाच्या 13 व्या दिवशीच नववधूकडून पतीच्या हत्येची तयारी, कारण घ्या जाणून
आणि धक्कादायक घटनेत पतीचा मृत्यू झाला. चार जणांनी जीवघेणा हल्ला केल्यामुळे पतीचा जागीच मृत्यू झाला.
Pune News: पुण्यातील एक दामपत्य महाबळेश्वरला हनीमुनला फिरायला गेले होते. त्यावेळी एक दुर्घटना घडली होती. 13 दिवसांपुर्वी त्यांच लग्न झाले होते. त्यामुळे फिरायला हनीमूनला महाबळेश्वर फिरायला जायचं ठरवलं. मित्र आणि त्याची बायको सोबत हे पुण्याहून कारने फिरायला जात होते. सर्व तयारीनिशी सर्व जण कार मध्ये बसले. थोडा रस्ता पार केल्यावर पत्नीने कार थांबवली. त्यावेळी थोंड बर नसल्याचे पतीला सांगितले. त्यामुळे नवदामपत्य कारमधून बाहेर पडलं. बाहेक पडल्याने काही वेळ थोडा चालत पुढे निघाले.
दरम्यान त्यांचाजवळ दोन बाईक वरून चार जण आले आणि त्यांच्यावर हल्ला केला. पती आणि पत्नीवर जोरदार हल्ला केल्यामुळे जागीच पतीचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये अवघ्या 13 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पतीचा मृत्यू झाल्याने पत्नी विधवा झाली. पोलीसांना ही माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतला.दोघांच लग्न 2018 साली झालं. त्यावेळी पोलीसांनी या घटनेची माहीती संपुर्ण माहिती घेतली. परंतू आरोपी पोलीसांच्या ताब्यात आला नाही. माध्यमांनी ही घटना उचलून घेतली.
आंनद कांबळे असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांच्या तपासणी नंतर आता आंनद यांची पत्नीने पतीला जीवे मारणाचा कट रचला होता, असं समोर आले. पोलीसांनी आंनद याच्या पत्नीचा फोन ताब्यात घेतला त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलीसांना पत्नीवर संयश आल्यावर फोन तपसाणी केली त्यावेळी तीनं लाईव्ह लोकेशन कोणाला तरी पाठवलं होत त्यावेळी तो व्यक्ती मित्रांसोबत येतो आणि आंनदला जीवे मारतो. या घटनेसंदर्भात पोलीसांनी काही धक्कादायक गोष्टी बाहेर काढल्या. आनंद याची पत्नी दिक्षा ही दुसऱ्या मुलाच्या प्रेमात असल्याचे समजले. घरांनी बळजबरीने लग्न लावून दिल्याचे समोर आले. दिक्षा आणि तीच्या प्रियकराने आंनदला जीवे मारून टाकण्याचा कट रचला होता.