पुण्यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून लहान मुलीसह विवहितेने केली होती आत्महत्या; 29 वर्षांनंतर कोर्टाकडून पतीला दोषी ठरवत तुरूंगात रवानगी

सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून त्या महिलेने 9 ऑक्टोबर 1992 ला मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

Court Hammer | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

29 वर्षांपूर्वी पतीने मानसिक, शारिरीक छळ केल्याने पतीच्या वागणूकीला कंटाळून पुण्यामध्ये एका विवाहित मुलीने अल्पवयीन मुलीसह आत्महत्या केली होती. मृत महिलेच्या भावाने केलेल्या तक्रारी नुसार, बहिणीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पुणे सत्र न्यायालयामध्ये (Pune Session Court)  आरोपीला दोषी ठरवत सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. याविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court)  गेलेल्याला आरोपीला तेथेही तुरूंगात रवानगीची शिक्षा मिळाली आहे.

रामदास धोंडू कलातकर असं आरोपीचं नाव आहे तर त्याच्यासोबत भारती नावाची महिला देखील देखील होती. जनाबाई दरेकर हिचा विवाह रामदास धोंडू कलातकर याच्यासोबत झाला होता. दुसर्‍या बाळंतपणाला माहेरी गेलेल्या जनाबाई सासरी आल्यानंतर त्यांना आपला पती दुसर्‍या महिलेसोबत राहत असल्याचं समजलं. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून त्या महिलेने 9 ऑक्टोबर 1992 ला मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हे देखील वाचा: Madhya Pradesh: पत्नीने घटस्फोटासाठी मागितले 1 कोटी, व्हिडिओच्या माध्यमातून दु:ख सांगत नवऱ्याने केली आत्महत्या .

या घटनेनंतर जनाबाईचा भाऊ भानुदास दरेकरने रामदास कलातकर, सासू नखूबाई आणि भारती यांच्याविरोधात छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली होती. पुढे कोर्टाने दोघांना दोषी ठरवले. दरम्यान सासूचा मृत्यू झाला होता. जनाबाईने रागाच्या भरात आत्महत्या केली नसून मुलीला जन्म दिल्याबद्दल तिच्यासोबत झालेल्या अमानुष वर्तनाबद्दल तिने आयुष्याची अखेर केली. असं मत कोर्टाने नोंदवत आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे.