Pune Leopard Attack : बापरे! जुन्नरमध्ये थेट रुग्णालयात शिरला बिबट्या; हल्ल्यात वनरक्षक जखमी

त्यामुळे बिबट्यांचा आता मानवी वसाहतीत वावर वाढला आहे. मंगळवारी रात्री बिबट्याने थेट पुण्यातील रुग्णालयातच प्रवेश केला आणि चांगलीच खळबळ उडाली.

Photo Credit- Pixabay

Pune Leopard Attack : पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या (Pune) परिसरात बिबट्यांचा (Leopard) वावर वाढला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची भिती निर्माण झाली (Pune Leopard Attack) आहे. मंगळवारी रात्री तर बिबट्याने थेट पुण्यातील रुग्णालयातच (Hospital) प्रवेश केला. परिणामी तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. सुदैवाने ती रात्री साडे दहाची वेळ होती. रुग्णालयात तेव्हा मोजकेत लोक होते. रुग्णाच्या वॉर्डचं दार बंद होतं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात ही घटना घडली. (हेही वाचा :Leopard Attack Thwarted in Pune: कुत्र्यांच्या दहशतीत बिबट्या शिकार सोडून पसार, घटनेचा व्हिडिओ व्हायरल )

मंगळवारी रात्री उशीरा बिबट्याने रूग्णलयात प्रवेश केला. खरंतर भक्षाच्या शोधात हा बिबट्या खाजगी रुग्णालयाच्या इमारतीत पोहचला होता. तिथे उपस्थित असलेल्या एकाने बिबट्या पाहताच वनविभागाच्या पथकाला पाचारण केले. त्यानंतर पथकाने सापळा रचत त्याला जेरबंद केले. या झटापटीत बिबट्याने वनरक्षकावर हल्ला केला. या हल्ल्यात कैलास भालेराव जखमी झाले. त्यांच्या हाताला मोठी इजा झाली. बिबट्याला जेरबंद करणारा हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी तेथे झाली होती. सध्या, जखमी वनरक्षकावर उपचार सुरू आहेत.  (हेही वाचा :Leopard Attack Video: राजापूर येथील पोलिस ठाण्यात बिबट्याची एन्ट्री, पाहा नेमकं पुढं काय झालं )

रूग्णालयात बिबट्या आहे हे समजताच नागरिकांनी हा सगळा थरार पाहण्यासाठी रूग्णालयात धाव घेतली होती. बघ्यांच्या मोठ्या गर्दीमुळे पथकाला बिबट्याला जेरबंद करण्यात अडचणी येत होत्या. मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. पाणी आणि भक्षाच्या शोधात हे बिबटे मानवी वस्तीत शिरत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif