Leopard Attack Video: महाराष्ट्रातील रत्नागिरीत रात्रीच्या वेळीस एका पोलिस ठाण्यात बिबट्याने एन्ट्री मारली आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पोलिस ठाण्यात घुसून कुत्र्याला पळवून नेत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुत्र्याची शिकार करून त्याला पळवून नेल्याचे दिसत आहे, ही घटना बुधवारी रात्री राजापूर पोलिस ठाण्यात घडली आहे. पोलिस ठाण्यात भटके कुत्रे भटकत होते. त्यांचा पाठलाग करत बिबट्या आवारात घुसला आणि एका कुत्र्याचा शिकार केला.
Video: पोलिस ठाण्यात रात्रीच्या वेळी घुसला बिबट्या अन् पकडली मान...
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यातुन कुत्र्याच्या मानेला पकडून नेले आहे.https://t.co/42LUDp6Iqz#leopard #Police #PoliceKaka @RatnagiriPolice pic.twitter.com/CP3eXJz3sX
— policekaka News (@policekaka) January 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)