पुणे: प्रियकराने थाटला दुसऱ्याच मुलीशी संसार; प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या

प्रियकरानं दुसऱ्याचं मुलीशी संसार थाटल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. प्रियकाराने दिलेला धोका जिव्हारी लागल्याने 22 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली.

पुणे: प्रियकराने थाटला दुसऱ्याच मुलीशी संसार; प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या
Representational Image (Photo Credits: File Image)

प्रियकरानं दुसऱ्याचं मुलीशी संसार थाटल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून (Pune) समोर आली आहे. प्रियकाराने दिलेला धोका जिव्हारी लागल्याने 22 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या आई-वडीलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Beed Suicide: छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या, उच्चशिक्षित अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल)

मनिषा गोविंद गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. काही दिवसांपासून तिचं हडपसर परिसरातील पानमळा येथे राहणाऱ्या नितीन दत्तात्रय गायकवाड (23) याच्याशी प्रेमसंबंध होते. याची कल्पना नितीनच्या आई-वडीलांनाही होती. तरी देखील त्यांनी दुसऱ्या मुलीशी त्याचे लग्न लावून दिले. (Amravati: पोलीस ठाण्यातच आरोपीची गळफास लावून आत्महत्या, अमरावती येथील घटना)

कोणतीही पूर्वकल्पना न देता प्रियकराने दुसऱ्याच मुलीशी विवाह केल्याने मनिषा नैराश्याच्या गर्तेत गेली. यातूनच तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मृत मनिषाचे वडील गोविंद यांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या आई-वडीलांसह प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Nashik: चिंताजनक! व्हॅलेंटाइन डेच्या काही तासाआधीच एका तरूणाची प्रेमभंगातून आत्महत्या; नाशिक येथील घटना)

प्रेमभंगातून आत्महत्या, हत्या, अॅसिड हल्ला केल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. सध्याच्या काळात शुल्लक कारणांवरुन आणि नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना सातत्याने कानावर येत आहेत. दरम्यान, नैराश्यायत असणाऱ्या व्यक्तीला वेळीच योग्य ती मदत केल्यास अनेक आत्महत्या आपण टाळू शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2021 07:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).