Pune Crime: पुणे शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा, हल्ल्यात वृद्ध महिला ठार

शिरूर तालुक्यातील ठोंबरेवस्ती येथे आनंदा सावळेराम ठोंबरे हे त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे यांच्या बरोबर राहतात. रविवारी रात्री ते त्यांची कामे आटोपून झोपले होते. मध्यरात्री 3 च्या सुमारास काही दरोडेखोर हे ठोंबरे यांच्या घरात घुसले.

Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

पुणे जिल्ह्यात (Pune Crime) रविवारी रात्री शिरूर (Shirrur) तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कल लुटली. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून वृद्ध व्यक्ति गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय 65) असे दरोडे खोरांच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर आनंदा सावळेराम ठोंबरे असे जखमी वृद्धाचे नाव आहे.  (हेही वाचा -  Pune Koyta Gang: पुण्यात आता अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडल्यास पालकांवरही होणार कारवाई; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा पालकांना इशारा)

शिरूर तालुक्यातील ठोंबरेवस्ती येथे आनंदा सावळेराम ठोंबरे हे त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे यांच्या बरोबर राहतात. रविवारी रात्री ते त्यांची कामे आटोपून झोपले होते. मध्यरात्री 3 च्या सुमारास काही दरोडेखोर हे ठोंबरे यांच्या घरात घुसले. दरम्यान, आवाज झाल्याने ठोंबरे दाम्पत्य जागे झाले. यावेळी दरोडे खोरांनी त्यांना जबर मारहाण केली. तसेच घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले.  या प्रकरणी आनंदा यांचा मुलगा बाबा ठोंबरे याने पोलिसांत तक्रार दिली आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटणास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास पथके तयार केली असून सिसिटीव्ही आणि श्वान पथकाच्या साह्याने त्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement