Pune Accident: कल्याण-भीमाशंकर एसटी बस पुलावरुन ओढ्यात कोसळली, अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी
कल्याणवरुन भीमाशंकरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे ही घटना घडली.
काल नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाल्यानंतर आज पुन्हा एसटीचा अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये एसटी बसला अपघात (ST Accident) झाला आहे. कल्याणवरुन भीमाशंकरच्या (Bhimashankar) दिशेने ही एसटी बस जात होती. एसटी बस पुलावरुन थेट ओढ्यामध्ये कोसळली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक गावकरी आणि पोलिसांनी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे. (हेही वाचा - Mumbai Local Train Update: बोरिवली स्टेशनच्या ट्रॅकवर 'पॉइंट फेल्युअर'मुळे पश्चिम मार्गावरील सेवा विस्कळीत, ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी)
पाहा ट्विट -
कल्याणवरुन भीमाशंकरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे ही घटना घडली. गिरवली येथील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून ही एसटी बस 20 फूट खोल ओढ्यात कोसळली. या बसमधून 35 प्रवासी प्रवास करत होते त्यामधले दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळावर रुग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यामध्ये काल एसटीला भीषण अपघात झाला होता. सप्तश्रृंग गडावरून खामगावला जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी बस सप्तश्रृंगी घाटातील (Nashik Bus Accident) दरीत कोसळली. या अपघातामध्ये एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)