पुणे: वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; एकाचा मृत्यू
यात रस्ता ओलंडणाऱ्या एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना पुणे येथील (Pune) म्हाळुंगे-बाणेर रस्त्यावर शनिवारी दुपारी घडली.
वाहनचालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुर्देवी अपघात घडला आहे. यात रस्ता ओलंडणाऱ्या एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना पुणे येथील (Pune) म्हाळुंगे-बाणेर रस्त्यावर शनिवारी दुपारी घडली. वाहनचालक ही महिला असून या घटनेनंतर तिने त्याठिकाणी न थांबता तेथून पळ काढळा. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेत आहेत.
मिराबाई मिश्रीलाल नुकुम असे अपघातात मृ्त्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मिराबाई या शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या खाली असणाऱ्या एका क्लिनीकमध्ये पैसे देऊन विरुद्ध दिशेने असणाऱ्या शिवांजली सुपर मार्केट येथे येत होत्या. त्यावेळी समोरून येणाऱ्या भरघाव कारने त्यांना जोरात धडक दिली. यात मिराबाई खाली कोसळून गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. हे देखील वाचा- जालना: व्यापारी राजेश नहार यांची गोळ्या झाडून हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालक ही महिला होती. अपघातानंतर वाहन चालक महिला घटनास्थळी न थांबता वाहन घेऊन तेथून तिने पळ काढला. स्थानिक नागरिकांनी या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहे.