Online Fraud: पुण्यात 30 वर्षीय तरूणाची Bike-Sharing App वर भरघोस नफा मिळवून देण्याच्या नावाखाली 15 लाखांची फसवणूक

पुण्यात एका आयटी प्रोफेशनला आर्थिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली सुमारे 15 लाखांचा गंडा घातल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

कोरोना संकटामध्ये ऑनलाईन फ्रॉडच्या देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. पुण्यात आता आठवडाभरातच दुसरी घटना समोर आली आहे. यामध्ये एका 30 वर्षीय तरूणला ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. सायबर फ्रॉड मधून त्याचे 15 लाख रूपये लुटले आहेत. या घटनेतील पीडीत व्यक्ती हा एक आयटी प्रोफेशनल आहे. एका बाईक शेअरिंग अ‍ॅप्लिकेशन मध्ये पैसे गुंतवणूक मोठा नफा मिळवण्याचं आमिष त्याला दाखवण्यात आलं होतं. असे इंडियन एक्सप्रेसचं वृत्त आहे. या प्रकरणी सध्या पोलिस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या तरूणाची फसवणूक केलेल्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्याने भारतामध्ये विविध शहरामध्ये आपण बाईक शेअरिंग अ‍ॅप चालवत असलेल्या एका कंपनीचा एक्झिक्युटिव्ह असल्याचं भासवलं. कॉल वर माहिती देत त्याने सहा महिन्यात सहा वेगवेगळ्या स्किम मधून 10 हजारांच्या गुंतवणूकीतून 5.8 लाख फायदा मिळू शकतो असे भासवले. Online Fraud: मुंबईच्या अंधेरी येथील महिलेची मेट्रिमोनी साइटवरून फसवणूक; गुन्हा दाखल.

दरम्यान पुढे या फसवणूक करणार्‍या व्यक्तीने अधिक नफा आणि बोनस मिळवण्याचं देखील आमिष दाखवलं. त्यांनी 14.96 लाख ट्रान्सफर करण्यास सांगितले. मागील डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान यामध्ये 10 वेगवेगळी ट्रान्झॅक्शन करण्यात आली. नंतर त्या आयटी प्रोफ्रेशनलच्या वाचण्यात काही फसवणूकीच्या गोष्टी वाचण्यात आल्यानंतर त्याने व्यवहार थांबवले.

तक्रारदार तरूणाने आपले पैसे मागण्यास सुरूवात केली पण तो पर्यंत सारी मेहनत वाया गेली होती. मग त्याने पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. वाकड पोलिस स्थानकामध्ये संबंधित प्रकरणी लागू आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.