शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त PUBG Tournament चे आयोजन
रायगड (Raigad) मधील रोहा (Roha) तालुक्यात शिवसेना युवासेना तर्फे पबजी टुर्नामेंटचे आयोजन केले आहे.
PUBG Tournament: सध्या तरुणाईमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला पबजी (PUBG) गेम खेळणाऱ्यांची संख्या दररोज वाढत चालली आहे. तसेच पबजी खेळल्यामुळे वाईट परिणाम ही समोर आले आहेत. तरीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांच्या जयंती निमित्त चक्क पबजी टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे.
रायगड (Raigad) मधील रोहा (Roha) तालुक्यात शिवसेना युवासेना तर्फे पबजी टुर्नामेंटचे आयोजन केले आहे. या टुर्नामेंटसाठी पोस्टरबाजी करण्यात आली असून बाळासाहेबांच्या फोटोसह त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. तसेच रोहा शहरात पहिल्यांदाच 'पबजी टुर्नामेंटचे तालुका स्तरीय आयोजन' असे लिहिण्यात आले आहे. या टुर्नामेंटला आजपासून रोहा येथे सुरुवात झाली आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषक आणि बक्षिस देण्यात येणार आहे. येत्या 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्याने राज्यात शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र जम्मू काश्मीर येथे पबजी खेळावर बोर्ड परीक्षांमुळे बंदी घालण्यात यावी अशी मागणी विद्यार्था संघटनेकडून केली जात आहे. परंतु रोह्यात सुरु झालेल्या या पबजी स्पर्धेमुळे काही लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.