कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही गैरसोय होत असल्यास 'या' क्रमांकावर साधा संपर्क; ठाणे पोलिसांकडून नागरिकांना दिलासा

देशातून महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातच कोरोना व्हायरचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत केले आहे.

पोलीस-प्रातिनिधिक प्रतिमा | (PTI photo)

भारतात कोरोना बाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशातून महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातच कोरोना व्हायरचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या निर्णयानंतर नागरिकांनी अत्यावश्यक साहित्यांच्या साठा करण्यासाठी आपल्या जवळील राशन दुकान, मेडिकल, एटीएम मशीनजवळ तुफान गर्दी केली होती. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर पडू नये अवाहन केले असतानाही नागरिकांनी केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केले. दरम्यान, नागरिकांनी लॉकडॉऊनच्या निर्णयाबाबत मनात गैरसमज निर्माण करून अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यातच ठाणे पोलिसांनी (Thane Police) ट्वीटरच्या माध्यामातून नागरिकांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक सर्व सेवा मिळतील. तसेच आपणांस कोणतीही गैरसोय होत असल्यास नागरिकांनी 100 क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊनची घोषणी केली. मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन केले जात आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. हा जनता कर्फ्यूच्या पुढील टप्पा असेल, असेही त्यांनी नमूद केले. यानुसार घराच्या बाहेर पडण्यावर बंदी असणार आहे. यामुळे नागिराकांनी अत्यावश्यक साहित्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व अत्यावश्यक सेवा, दुकाने खुली असतील. सर्वप्रकारच्या वस्तू आपल्याला आपल्या जवळच्या दुकानात नेहमीप्रमाणे उपलब्ध होतील. कृपया शांत आणि संयमी रहा. आपणास कोणतीही गैरसोय होत असल्यास 100 नंबर वर संपर्क साधा, अशा आशायाचे ट्वीट ठाणे पोलिसांनी केले आहे. हे देखील वाचा- आपल्याला 21 दिवसांत कोरोना व्हायरसच्याविरोधात लढाई जिंकायची आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे मांडले 'हे' महत्वाचे मुद्दे

ठाणे पोलिसांचे ट्विट-

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज दुपारपर्यंत 116 होती. मात्र, मुंबईत 5 तर ठाण्यात 1 असे एकूण 6 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.