Pradhan Mantri Awas Yojna: मुंबई महानगरात PMAY अंतर्गत घरांसाठीचा EWS उत्पन्नाचे निकष बदलले, कमकुवत घटकांसाठीच्या मर्यादेत 3 लाख रुपयांवरून 6 लाख रुपयांपर्यंत वाढ

प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी लागू असलेला आर्थिक कमकुवत घटकांसाठीच्या निकषात आता बदल झाला आहे. हा बदल मुंबई महानगर क्षेत्रासाठी लागू आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

Pradhan Mantri Awas Yojna: तुम्ही जर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये (Mumbai Metropolitan) घर घेण्याचे स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी लागू असलेला आर्थिक कमकुवत घटकांसाठीच्या निकषात आता बदल झाला आहे. हा बदल मुंबई महानगर क्षेत्रासाठी लागू आहे. सुरुवातीला आर्थिक कमकुवत घटक म्हणून असलेला 3 लाखांचा निकष आता 6 लाखांवर नेण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा फायदा शेकड नागरिकांना होणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. राज्य सरकार त्यासाठी प्रयत्नशील होते. राज्य सरकारच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.केंद्र सरकारने तसा निर्णय घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

केंद्रीय नगरविकास आणि गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार, म्हाडा आणि सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अर्थात हे नागरिक एमएमआर क्षेत्रातील असायला हवेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केली होती की, प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रासाठी (एमएमआर) आर्थिक कमकुवत घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) उत्पन्नाचे निकष ३ लाखांऐवजी ६ लाख रुपये करण्यात यावेत. राज्य सरकारने हे विनंती पत्र 21 जून 2023 रोजी पाठवले होते. (हेही वाचा,  Mumbai MHADA Lottery 2023: मुंबईत म्हाडा चार हजार घरांसाठी काढणार सोडत, गोरेगाव येथे 2, 638 घरांचा प्रकल्प, जाणून घ्या, सविस्तर माहिती .)

राज्य सरकारने पत्राद्वारे केलेली वनंती मान्य करावी यासाठी राज्याचा प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी संपर्क साधला होता. केंद्राने मागणी मान्य केल्याबद्दल राज्य सरकारने आभार मानले आहेत.