मुंबई मध्ये कार शोरूमच्या Sales Executive ने नवी कार देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची केली 75 हजारांची फसवणूक
नंतर परमीट्स साठी 75 हजार रूपये मागितले. या व्यक्तीला कधीच गाडी मिळली नाही
मुंबई मध्ये एका सेल्स एक्झिक्युटिव ने गरीब व्यक्तीला 75 हजारांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. ब्रॅन्ड न्यू गाडी देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबई मध्ये भायखळा आणि मुंबई सेंट्रल भागात असणार्या आग्रिपाडा येथील एका शोरूम मध्ये हा प्रकार घडला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्स नुसार, फसवणूक केलेल्या व्यक्तीकडून सुरूवातीच्या टप्प्यावर 75 हजार रूपये घेतले. यामध्ये आरोपीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. नक्की वाचा: Online Fraud: पुण्यात 30 वर्षीय तरूणाची Bike-Sharing App वर भरघोस नफा मिळवून देण्याच्या नावाखाली 15 लाखांची फसवणूक.
आग्रीपाडा पोलिसांनी इक्बाल सिद्दीकी या व्यक्तीला अटक केली आहे तर शाहीद सय्यदचा शोध सुरू आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार, डिसेंबर 2019 मध्ये संजय कदम हा टॅक्सी ड्रायव्हर कार शोरूम मध्ये गेला होता. प्रायव्हेट टॅक्सी चालवण्यासाठी ते कार घेण्यासाठी सेल्स मॅनेजरला भेटले. इक्बालने बुकींगसाठी 10 हजार रूपये मागितले.
सुरूवातीला दहा हजार आणि नंतर दोन दिवसांनी 15 हजार रूपये मागितले. नंतर परमीट्स साठी 75 हजार रूपये मागितले. या व्यक्तीला कधीच गाडी मिळली नाही. नंतर त्या गरीब व्यक्तीला कळलं की आपली फसवणूक झाली आहे. नंतर तो जेव्हा शोरूमला गेला तेव्हा त्याला कळलं की त्याला कामावरून काढलं आहे.