धक्कादायक! Amazon वर होत आहे गर्भपाताच्या औषधांची विक्री; कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी ही गोष्ट उघडकीस आणली. या गोष्टीची गंभीर दखल घेत
देशात न्यायालयाच्या परवानगीशिवाय गर्भपाताला (Abortion) बंदी आहे, मात्र तरी गर्भपाताच्या औषधांची अॅमेझॉनवर (Amazon)ऑनलाईन विक्री होताना दिसत आहे. महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी ही गोष्ट उघडकीस आणली. या गोष्टीची गंभीर दखल घेत रायगडच्या पेणमधील कामोठे पोलिस ठाण्यास 'एफआयआर' दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाबाबत शिवसेनेच्या प्रकत्या निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनीही ट्विट करुन, या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताची औषधे मिळत नाहीत. तसेच ही औषधे घेण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला आणि परवानगी असणे महत्त्वाची असते. सरकारनेही न्यायालयाच्या परवानगीशिवाय गर्भपातावर बंदी आणली आहे. हे सर्व नियम धाब्यावर बसवून अॅमेझॉनवर गर्भपाताची औषधे विकली जात आहेत. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने वृत्त दिले होते. कैलास तांदळे यांनी अशाप्रकारची औषधे मागवली होती, ज्याची त्यांना घरपोच डिलिव्हरी मिळाली. (हेही वाचा: गर्भवतीच्या जीवाला गंभीर धोका असल्यास पाच महिन्यांनंतरही गर्भपाताला आमच्या अनुमतीची गरज नाही- मुंबई उच्च न्यायालय)
ही बात अत्यंत गंभीर असल्याने याबाबत ताबडतोब, अन्न आणि औषध प्रशासनाला (FDA) माहिती देण्यात आली. या प्रकरणी नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्यात कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रायगड एफडीएकडून आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अॅमेझॉन जरी ही औषधे विक्रीसाठी ठेवली असली, तरी ती उत्तर प्रदेशच्या विठ्ठल ड्रग स्टोअर येथून आली आहेत. आता पोलीस कंपनीसह उत्तर प्रदेशमधील औषध विक्रेत्यांचीही चौकशी करणार आहेत.