PMC Bank Scam: पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

मात्र त्यांच्याकडील संपत्ती ईडीने (ED) जप्त केली असून ती मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.

PMC Bank | (Photo Credits: PTI)

पीएमसी बँक घोटाळा (PMC Bank Scam) प्रकरणातील आरोपी एचडीआयएलचे प्रमुख सारंग आणि राकेश वाधवान यांना सध्या अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडील संपत्ती ईडीने (ED) जप्त केली असून ती मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून पीएमसीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात असे म्हटले आहे की, एचडीआयएलची 4355 कोटीची वसूली अद्याप बाकी आहे. मात्र ईडीने आतापर्यंत 3800 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे आता ही मालमत्ता विकून त्यामधील पैशांमधून बँक ग्राहकांचे पैसे परत केले जाणार आहेत.

तसेच एचडीआयएलची संपत्ती विकण्यासाठी तीन सदस्यांची समिती बनवली आहे. कारण संपत्तीची वसूली जलद गतीने व्हावी हा यामागील मुख्य हेतू आहे. न्यायमूर्ती आर वी मोरे आणि न्यायमूर्ती एस पी तावडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश एस राधाकृष्णन या समितीचे प्रमुख असमणार आहेत. समितीच्या अन्य दोन सदस्यांची निवड समितीचे अध्यक्ष करणार आहे. न्यायालयाने सुनावणीची पुढील तारीख 30 एप्रिल दिली आहे. तोपर्यंत आतापर्यंत या प्रकरणी कामांचा आढावा मागितला आहे.(PMC Bank Scam: पीएमसी बँक खातेधारकांना हायकोर्टाकडून झटका, आरबीआयकडून लावण्यात आलेले आर्थिक निर्बंध हटवण्यास नकार)

कोर्टाने आर्थर रोड तुरुंगाचे अधिक्षकांना असे निर्देश देण्यात आले आहे की, एचडीआयएलचे प्रमुख राकेश आणि सारंग वाधवान यांना बांद्रा येथील घरी स्थालांतरित करावे आणि त्यांना नैजरकैदेत ठेवावे असे म्हटले आहे. मालमत्तांचा लिलाव आणि ठेवीदारांना पैसेवाटप यात कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी वाधवान पितापुत्राने घ्यावी, असेही खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.