Pipeline Burst Near Amar Mahal Junction: चेंबूर च्या अमर महल भागात पाईप लाईन फुटली; मुंबईत पुढील 24 तास पूर्व उपनगरात पाणी पुरवठा राहणार विस्कळीत

मुंबई मध्ये पुढील 24 तास पाईप लाईन दुरूस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने पाणी पुरवठा सुरळीत होईल असे बीएमसी अधिकार्‍याने सांगितले आहे.

Pipeline Burst Near Amar Mahal | X @sameerreporter

मुंबई मध्ये एकीकडे उन्हाच्या झळा तीव्र होत असताना पाणी कपातीचं संकट घोंघावत असताना आता मुंबई मध्ये चेंबूरच्या (Chembur) अमर महल जंक्शन (Amar Mahal Junction)  भागात मेट्रो कस्ट्रक्शन काम सुरू असताना पाईपलाईन फुटली आहे. सुमारे 1200 एमएम व्यासाची पाईप लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. सध्या बीएमसी कडून या भागात दुरूस्तीचं काम सुरू आहे. याच भागात 1800 एम एम ची अजून एक पाईप लाईन देखील तात्पुरती बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. Thane Water Cut: ठाण्यात STEM Pipeline मध्ये पाणी गळती मुळे तातडीने दुरूस्तीचं काम हाती; आज पहा कुठल्या भागात पाणी पुरवठा विस्कळीत? 

अमर महल भागात पाईपलाईनचं काम सुरू असल्याने पूर्व उपनगरात अनेक भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामध्ये चेंबूर, सायन, शिवाजी नगर, मानखूर्द, घाटओपर, कुर्ला, वडाळा, परेल पर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत होईल अशी माहिती समोर आली आहे. (हेही वाचा: Mumbai Wate Lake Evaporation: मुंबईच्या घशाला कोरड? उन्हाचा ताप, बाष्पीभवन वाढले; पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा घटला).

अमर महल भागात पाईपलाईन फूटली

एफ दक्षिण विभागातील काही भागात पाणीपुरवठा अंशत: बंद

View this post on Instagram

A post shared by माझी Mumbai, आपली BMC (@my_bmc)

FPJ च्या बातमीनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, पुढील 24 तासांसाठी या भागातील पाणीपुरवठा बंद राहील. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या भागातील पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या काळात रहिवाशांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement