Navi Mumbai: ST Bus कंडक्टरला मारहाण केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी 42 वर्षीय व्यक्तीला अटक
सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. सुनील गंगाधर थळे असे आरोपीचे नाव असून, तो पनवेल बस डेपोत चढला होता.
Navi Mumbai: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation ST) बस कंडक्टरला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी (Panvel Police) एका 42 वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपी प्रवाशाने कंडक्टरला बस थांबत नसलेल्या थांब्यासाठी तिकीट देण्यास भाग पाडल्यानंतर ही घटना घडली.
सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. सुनील गंगाधर थळे असे आरोपीचे नाव असून, तो पनवेल बस डेपोत चढला होता. त्याने पेणमधील रामवाडीला बसचे थांबे नसलेल्या तिकीटाची विनंती केली होती. (हेही वाचा - Nashik Chauafali Road Accident: नाशिक येथील चौफळी मार्गावर अपघात, भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुलकल्याने गमवले प्राण)
गुहागर बस डेपोशी संलग्न असलेले बस कंडक्टर विष्णू साळोखे यांनी तिकीट देण्यास नकार देत तसे समजावून सांगितले. मात्र, प्रवाशाने तिकीट देण्यासाठी दबाव टाकला. यावरून वाद झाला आणि नंतर त्याने कंडक्टरला मारहाण केली. (हेही वाचा - Death Threat To Dhananjay Munde: मला 50 हजार रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारीन; धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी)
अखेर कंडक्टरने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी तत्काळ सुनील थळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
(The above story first appeared on LatestLY on Jul 11, 2023 04:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

