IPL Auction 2025 Live

पंंढरपुर विठ्ठल-रखुमाई मंंदिराच्या गाभार्‍यात स्वातंंत्र्यदिना निमित्त तिरंगी फुलांची आरास, पहा फोटो

स्वातंंत्र्यदिना निमित्त भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंंग्याच्या रंंगाच्या फुलांंची आरास विठ्ठल-रखुमाई मंंदिराच्या गाभार्‍यात करण्यात आली आहे.

Pandharpur Vitthal Rakhumai Temple On Independence Day 2020 (Photo Credits: Twitter)

Indian Independence Day 2020: भारताचा 74 वा स्वातंंत्र्य दिन आज कोरोनाच्या (Coronavirus) संकटात सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. याच निमित्त पंंढरपुर येथे असणार्‍या विठ्ठल-रखुमाई मंंदिरात (Vithhal- Rukimini Temple) अनोख्या पद्धतीची सजावट करण्यात आली आहे. स्वातंंत्र्यदिना निमित्त भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंंग्याच्या रंंगाच्या फुलांंची आरास विठ्ठल-रखुमाई मंंदिराच्या गाभार्‍यात करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, ही सजावट पुण्यातील मोरया समूहाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर या सजावटीचे सुंंदर फोटो पाहायला मिळत आहेत. पंंढरपुरच्या विठ्ठल-रखुमाई मंंदिराच्या गाभार्‍यात सर्व सणांंच्या निमित्ताने अशाच प्रकारची फुलांची आरास करण्यात येते, यानिमित्ताने हे मंंदिर नेहमीच चर्चेत असते.

Independence Day Wishes in Marathi: 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मराठी Messages, Whatsapp Status मधुन शेअर करण्यासाठी खास शुभेच्छापत्र!

या फुलसजावटीत आपण पाहु शकता की, रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाची पैठणी नेसवण्यात आली असून गळ्यात तिरंगी उपरणं घालण्यात आलं आहे. तसेच विठ्ठ्ल मुर्तीला सुद्धा गळ्यात तिरंंगी उपर्णे घालून सजवण्यात आला आहे, हा अनोखा साज श्रुंगार भाविकांंच्या पसंतीस उतरत आहे.

विठ्ठल- रखुमाई मंंदिरात स्वातंत्र्य दिनाची सजावट

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापुर्वीच मुंंबईतील शासकीय निवासस्थान वर्षा बंंगल्यावर महाराष्ट्र पोलिसांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा व विभागीय मुख्यालयात असे समारंभ आयोजित केले जातील जिथे कोविड वॉरिअर्सच्या खास उपस्थितीत ध्वजारोहण केले जाणार आहे.