Palghar: 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या 11 वर्षीय मुलाला बोईसर येथून अटक

या मुलाला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले.

Arrest (Photo Credits: File Image)

Palghar: पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका 11 वर्षीय मुलाला पालघर मधील बोईसर येथून अटक करण्यात आली आहे. या मुलाला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला भिवंडीतील बालसुधार गृहात पाठवले आहे. पीडित मुलीची वैद्यकिय चाचणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे.(Mumbai Shocker: अंधेरी मध्ये 51 वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक)

बोईसर पोलीस स्थानकातील सुरेश कदम यांनी असे म्हटले की, मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. तेव्हा पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितले.(Sakinaka Rape and Murder Case: राज्य सरकार कडून पीडीतेच्या कुटूंबाला 20 लाखांची मदत)

आरोपी हा 7 वी इयत्तेत शिकणारा मुलगा आहे. मुलीला आमिष दाखवत एका निर्जळ स्थळी घेऊन गेला. तेथेच तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता त्याने त्याचा गुन्हा मान्य केला. मुलाच्या विरोधात आयपीसी कलम 376 आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह अन्य ठिकाणच्या बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे संताप व्यक्त केला जात असून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  महिला सुरक्षा प्रकरणी आज पोलिस दलाचे प्रमुख, जीआरपी कमिश्नर, राज्य गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती.