पालघर येथे गेल्या 24 तासात आणखी 277 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 7 हजारांच्या पार
पालघर येथे गेल्या 24 तासात आणखी 277 कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडल्याने आकडा 7 हजारांच्या पार गेला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. नागरिकांना वारंवार सांगून सुद्धा ते नियमाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत असल्याने थेट कारवाई करण्यात येत आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान आता पालघरकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पालघर येथे गेल्या 24 तासात आणखी 277 कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडल्याने आकडा 7 हजारांच्या पार गेला आहे.(बीड: परळी शहरात स्टेट बँकेचे 5 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आजपासून 8 दिवस लॉकडाऊनचे आदेश)
पालघर येथे कोरोनाच्या रुग्णांची दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रयत्न ही केले जात आहेत. तरीही रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने पालघर मधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 हजार 274 वर पोहचला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचारी आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहेत. कोरोनावर अद्याप लसीचा शोध लागला नसून देशभरातील संशोधकाकडून या बाबत अभ्यास केला जात आहे. तसेच राज्य सरकार सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. (COVID19 Cases In Dharavi: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 23 हजार 23 जणांना कोरोनाची लागण; दिवसभरात 12 नव्या रुग्णांची नोंद)
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्या पार गेला आहे. शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 7074 कोरोनाबाघित रुग्णांची भर पडली असून 295 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून लॉकडाऊनचे नियम शिथिल करत काही गोष्टी सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतु नागरिकांना नियमांचे पालन करावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.