Cyrus Mistry Death: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्ष 2022 मध्ये साइरस मिस्त्री यांच्यासह 60 लोकांचा मृत्यू, 100 किमी आंतराचा प्रवास ठरतोय जीवघेणा

या महामार्गावर या वर्षात अशाच प्रकारचे अनेक अपघात घडले आहेत.

Cyrus Mistry | (Photo Credit - ANI/Twitte)

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry Death) यांचे या महिन्याच्या (सप्टेंबर 2022) सुरुवातीला महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात झालेल्या अपघातात निधन झाले. दरम्यान, अधिकृत नोंदींवरून असे दिसून आले आहे की, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) सायरस मिस्त्री ((Cyrus Mistry) यांच्या कारचा अपघात ही एकच घटना नव्हती. या महामार्गावर या वर्षात अशाच प्रकारचे अनेक अपघात घडले आहेत. ज्यामुळे जवळपा 60 पेक्षाही अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

ठाण्यातील घोडबंदर आणि पालघर जिल्ह्यातील दापचरी दरम्यानच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या 100 किमी लांबीच्या आंतरात या वर्षी आतापर्यंत 262 अपघात झाले आहेत. ज्यात किमान 62 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 192 जण जखमी झाले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा, Cyrus Mistry Death Case: आता Mercedes कार कंपनी करणार सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूची चौकशी, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, 100 किमी आंतरावर घडलेल्या एकूण अपघातांमध्ये असेही आढळून आले आहे की, यापैकी अनेक घटनांमध्ये अतिवेगाने वाहने हाकणे आणि चालकाकडून वाहान हाकताना चुकीच्या पद्धतीन घेतलेले निर्णयसुद्धा कारणीभूत ठरले आहेत. याशिवाय, अधिका-यांचे म्हणणे आहे की रस्त्याची खराब अवस्था, नसलेली देखभाल, योग्य चिन्हाचा अभाव आणि वेग प्रतिबंधक उपायांचा अभाव हे देखील अपघातांच्या मोठ्या संख्येला कारणीभूत आहेत.

महाराष्ट्र महामार्ग पोलिस विभागाचे अधिकारी सांगतात की, पनवेल जिल्ह्यातील चारोटी जवळील भाग, जिथे सायरस मिस्त्री ज्या मर्सिडीज कारने 4 सप्टेंबर रोजी प्रवास करत होते. या ठिकाणी त्यांचा अपघात झाला. याच ठिकाणी थोड्या थोड्या आंतरांच्या फरकाने यंदा वर्षाच्या सुरूवातीपासून आतापर्यंत 25 गंभीर अपघातांमध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे.